केळीवरील रोग व कीडींचे नियंत्रण करण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला

banana

जळगाव : जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या केळी बाजारपेठेत जळगावच्या केळीचा मोठा वाटा आहे. असे असले तर गत काही वर्षांपासून निसर्गचा लहरीपणा व अन्य काही कारणांमुळे केळीवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव होवून नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. या दृष्टीने कृषी शास्त्रज्ञ व तज्ञांनी केळीवर पडणारे रोग व कीडींवर संशोधन करुन शेतकर्‍यांना काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

रोग : करपा (सिगाटोका)
नियंत्रणाचे उपाय :
१. रोगग्रस्त पानाचा भाग किंवा पूर्ण पान रोगग्रस्त असेल तर पूर्व पाने काढून बागेबाहेर नेऊन जाळावेत.
२. पहिली फवारणी- १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + १०. मि.ली. स्टिकर एकत्रित या द्रावणाची फवारणी करावी.
३. दुसरी फवारणी- दुसरी फवारणी करण्याआधी रोगग्रस्त पाने काढून बागेच्या बाहेर टाकावीत व नंतर १० मि.ली. प्रॉपीकोनॅझोल + १० मि.ली. स्टिकर एकत्र मिसळून फवारणी करावी.
४. तिसरी फवारणी- दुसर्‍या फवारणीनंतर २१ दिवसांनी तिसरी फवारणी करावी. फवारणी करण्याआधी रोगग्रस्त पाने काढावी व नंतर फवारणी घ्यावी. ५ ग्रॅम कार्बेन्डॅझिम + १०० मि.ली. मिनरल ऑईल १० मि.ली. पाण्यात घेऊन फवारणी करावी.
५. चौथी फवारणी – तिसर्‍या फवारणी नंतर १५ दिवसांनी फवारणी द्यावी. फवारणी घेणे आधी बागेची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रॉपीकोनॅझॉल ५ मि.ली. + १०० मि.ली. मिनरल ऑईल एकत्र मिसळून फवारणी करावी.
६. रोगाची तीव्रता अधिक असल्यास प्रति १० लीटर पाण्यात प्रोपीकोनॅझॉल ५ मि.ली. किंवा कार्बेन्डॅझिम ५ ग्रॅम + दिवसाच्या अंतराने कराव्यात. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

रोग : इर्विनिया रॉट (हेडरॉट)
नियंत्रणाचे उपाय :
लागवडीनंतर १०० ली. पाण्यात ३०० ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड + १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन + ३०० मि.ली. क्लोरोपायरीफॉस द्रावण तयार करून प्रत्येक झाडास २०० मि.ली. द्रावण टाकावे.

रोग : पर्णगुच्छ (बंची टॉप) व कुकुंबर मोझॅक व्हायरस
नियंत्रणाचे उपाय :
१. कंदापासून लागवड करताना शिफारस केल्याप्रमाणे कंद प्रक्रिया करावी.
२. ऊती संवर्धित रोपांची लागवड करताना २ ते २.५ महिने कठिनता आणलेली रोपांचीच लागवड करावी.
३. केळी पिकात किंवा बागेभोवती काकडी वर्गीय, वांगेवर्गीय पिके घेऊ नयेत.
४. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाड उपटून समूळ नष्ट करावे.
५. रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होत असल्याने झाडांवर आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.

केळीवरील किडींच्या नियंत्रणाचे उपाय

कीड : सोंडकीड
नियंत्रणाचे उपाय :
१) १०० ली पाण्यात १५० ग्रॅम अ‍ॅसिफेट पावडर मिसळून त्या द्रावणात कंद ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
२) पिकांची फेरपालट करावी.
कीड : खोडकीड
नियंत्रणाचे उपाय
: बाग स्वच्छ ठेवावी. खोडवा घेणे टाकावे.
कीड : फुलकिडी
नियंत्रणाचे उपाय :
१) अ‍ॅसीटॅम्मीप्रीड २० एस.पी. १.२५ ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ एस.सी. १५ मि.ली. किंवा व्हर्टीसिलीयम लेकॅनी या जैविक बुरशीची ३० ग्रॅम प्रति १० ली. पाण्यात घेऊन घडावर फवारणी करावी.
२) किंवा निंबोळी अर्क ५०० मि.ली. १० ली. पाण्यात घेऊन फवारणी करावी.
३) घड २ ते ६ टक्के सच्छिद्रतेच्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकावेत.
कीड : मावा
नियंत्रणाचे उपाय :
१) डायमिथोएट २० मि.ली. १० ली पाण्यात घेऊन फवारावे किंवा अ‍ॅसिफेट १४ ग्रॅम १० ली. पाण्यात घेऊन फवारावे.
कीड : सूत्रकृमी
नियंत्रणाचे उपाय :
१) केळी लागवडीच्या वेळी कंद तासून वरीलप्रमाणे कंद प्रक्रिया करावी.
२) लागवडीच्या वेळी निंबोळी पेंडीचा वापर करावा
३) केळी बागेत झेंडू हे आंतरपीक घ्यावे.

Exit mobile version