शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा

farmer 1 1

कोल्हापूर : शेत जमीनीची उत्पादक क्षमता कमी झाली असल्याची जवळपास सर्वच शेतकरी करतात मात्र या मागील कारणांचा शोध कुणी घेत नाही. अर्थात तसे पाहिल्यास यातील प्रमुख कारण सर्वांना माहित आहे. तो म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशकांचा अति वापर! शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्याने त्याचा जमिनीवर वाईट परिणाम झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शेतजमिनीची उत्पादकता सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे जमीनीची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमीनीची कमी झालेली उत्पादकता कशी वाढवायची? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अधिक वापर केल्यामुळे आणि पीक विविधतेच्या प्रक्रियेचा अवलंब न केल्यामुळे जमिनीच्या उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम झाला आहे. यामुळेच शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करणे अधिक योग्य ठरते. हे जितक्या लवकर शेतकर्‍याला समजेल तितकक्या लवकर तो त्याच्या शेताची सुपीकता परत मिळवू शकेल. शेतकरी त्यांच्या पिकांसाठी गांडूळ खत, हिरवळीचे खत किंवा नैसर्गिक कीटकनाशके वापरूनही माती निरोगी ठेवू शकतात.

शेतकर्‍यांनी एकच प्रकारची शेती सतत करू नये. त्यांना पीक रोटेशनचा अवलंब करण्याचा सल्ला देखील दिला जातो. त्यासाठी खरीप-रब्बी पिकांच्या लागवडीबरोबरच कडधान्य पिकांचीही लागवड करता येते. कारण कडधान्य पिकांमध्ये अशी अनेक पोषक तत्वे आहेत जी जमिनीचे आरोग्य सुधारतात. याशिवाय इतर नगदी म्हणजेच फायदेशीर पिकेही शेतकरी घेऊ शकतात. यासह शेतकर्‍यांनी शेतात कडुलिंब, कॅटनीप, कोरफड यांसारखी पिके लावली तर शेतात शत्रू कीटकांची वाढ होणार नाही.

Exit mobile version