शेतकरी कर्जमाफीचा नुसता गाजावाजा पण अजूनही तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, वाचा सविस्तर

farmer-debt-waiver-is-just-a-rumor-but-still-many-farmers-are-deprived-of-loan-waiver

मुंबई : महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला मात्र अजूनही तब्बल ३५ हजार ६२९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांना सरकारने कर्जमाफी दिली, पण नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या या सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

राज्यात उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. २८ डिसेंबर २०१९ ला कर्जमाफीचा आदेश निघाला. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ आतापर्यंत ३१ लाख ८१ हजार १७८ शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यांना २० हजार २९० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.

सर्वाधिक ७४२२ कोटी रुपयांची कर्जमाफी मराठवाड्याला, त्या खालोखाल ५३८४ कोटी रुपयांची कर्जमाफी विदर्भाला मिळाली. पश्चिम महाराष्ट्राला २८१७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली. मात्र, ३५ हजार ६२९ शेतकर्‍यांना १५६ कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप मिळू शकलेली नाही.

कर्जमाफीची जिल्हावार आकडेवारी (रक्कम कोटी रुपयात)

विदर्भ : अकोला – ६३८.०५ कोटी, अमरावती – ८४४.३१, भंडारा – १५५.२९, बुलडाणा – ११४१.८२, चंद्रपूर – ३१९.२२, गडचिरोली – ७४.६२, गोंदिया – १०९.७९, नागपूर – ३८५.२०, वर्धा – ४६७.२७, वाशिम – ५८५.५१, यवतमाळ – ६६३.७८

मराठवाडा : औरंगाबाद – ९८३.९३ कोटी रु., बीड – १५०९.६५, हिंगोली – ६०२.९५, जालना – १०४५.९२, लातूर – ३४२.८२, नांदेड – १२८०.२९, उस्मानाबाद – ५१३.४०, परभणी – ११४३.७६

उत्तर महाराष्ट्र : अहमदनगर – १७८८.५४ , जळगाव – ९१६.६७, नंदुरबार – १९२.८३, नाशिक – ११५५.१९, धुळे – ३४३.२९.

कोकण : पालघर – ७०.४०, रायगड – ४४.२५, रत्नागिरी – ६४.४०, सिंधुदुर्ग – ४१.७३, ठाणे – ८७.९३.

पश्चिम महाराष्ट्र : कोल्हापूर – २८६.४०., पुणे – १०२४.५०, सांगली – ४८१,२५, सातारा – ३७२.८२, सोलापूर – ६५२.४४.

Exit mobile version