१० वर्ष जोपासलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान होताच शेतकर्‍याने उचलले हे पाऊल

grapes

द्राक्ष बाग

सोलापूर : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा आंबा आणि द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसलेला आहे. आताही मान्सूनपूर्व पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा) येथील अशोक वायकर यांना तर मोठे नुकसान सोसावे लागले आहे. छाटणीच्या दरम्यानच सोलापूर जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली होती. यामध्ये एकट्या वायकर यांचे १७ लाखाचे नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत नुकसान होत असल्याने वायकर यांनी दीड एकरातील १० वर्षे जोपासलेली बाग द्राक्षाच्या घडासह तोडून टाकली आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत अवकाळी अवकृपा कायम राहिली. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली ती शेवटपर्यंत कायम राहिली. आताही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली आहे. याचा मोठा फटका वायकर यांनी बसला आहे. त्यांची दीड एकरात द्राक्षची बाग होती.
आतापर्यंत आलेल्या नैसर्गिक संकटांचा सामना करत त्यांनी बाग जोपासली. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षतोड बाकी असतांना मान्सूनपूर्व पावसाने होत्याचे नव्हेते केलं. सौदा झालेल्या बागेचीही छाटणी अवकाळीने होऊ दिली नाही. पिकवलेली द्राक्ष मातीमोल झाल्याने त्यांचे सोळा ते सतरा लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले यामुळे त्यांनी द्राक्षच्या घडांसह बागेची छाटणी करत फेकून दिली.

Exit mobile version