शेतकरी नेते राकेश टिकैत एकटे पडले; आज तर त्यांच्या तोंडावर शाई फेकली

Farmer leader Rakesh Tikait throws ink

बंगळूरु : तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर वर्षभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे आता एकटे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. टिकैत यांच्या बेताल वक्तव्यांमुळे भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडली आहे. आता तर टिकैत यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकल्याची घटना घडली आहे.

एका खाजगी वाहिनीने नुकतेच टिकैत यांचे सहकारी व शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन केले होते. चंद्रशेखर शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली पैसे उकळतात असा दावा केला होता, या स्टिंग ऑपरेशनमध्ये चंद्रशेखर यांनी शेतकरी नेते युधवीर सिंह यांचे नाव घेतले होते. यावर खुलासा करण्यासाठी राकेश टिकैत आणि युधवीर सिंग आज बंगळुरूत आले होते आणि गांधी भवनात पत्रकार परिषद घेत होते.

टिकैत यांनी पत्रकार परिषद सुरु असतांना एका व्यक्तीने त्यांच्या समोरील माईक उचलून त्यांना मारहार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी टिकैत समर्थक कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला बाजूला करताच अन्य एका व्यक्तीने टिकैत यांच्या तोंडावर शाई फेकली. यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये तुफान हाणामारी आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. पत्रकार परिषद सभागृहात गोंधळ घालणार्‍या आणि टिकैत यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या काही जणां पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे लोक शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे समर्थक असू शकतात, असे बोलले जात आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत, चंद्रशेखर यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही, देशव्यापी शेतकरी आंदोलनादरम्यानही चंद्रशेखर यांची संशयास्पद पार्श्‍वभूमी समजल्यावर त्यांनी चंद्रशेखर यांना आंदोलनातून बाहेर काढले होते, अशी माहिती दिली.

Exit mobile version