शेतकर्‍यांनो सेंद्रिय शेतीचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

nano-fertilizer

हरितक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात भारतात केवळ पारंपारिक आणि सेंद्रिय शेती केली जात होती, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा भरून काढण्यासाठी कमी क्षेत्रात व कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्याची आवश्यकता होती. यामुळे देशात रासायनिक खते आणि बियाणांच्या सुधारित जातींचा ट्रेंड सुरू झाला. यामुळे अन्नधान्याचे उत्पादन निश्‍चितपणे वाढले मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

जमीनीची गुणवत्ता खराब होणे, अन्नधान्याची गुणवत्ता कमी होणे, रसायने पोटात जावून विविध आजारांचे प्रमाण वाढणे, पर्यावरणाचे संकट उभे राहणे अशा संकटांची मालिकाच मानवजातीपुढे उभी राहीली आहे. यामुळे यामुळे पुन्हा सेंद्रिय शेतीचे महत्व जाणवू लागले आहे.

रसायनमुक्त शेतीला अनेक नावांनी ओळखले जाते यामध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती, शास्वत शेती, रोटेशन सील फार्मिंग, वैदिक शेती आदींचा उल्लेख होतो. रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीमधील मुळ फरक म्हणजे, सेंद्रिय शेतीमध्ये अशी खते वापरली जातात ज्यात जीवन असते. सेंद्रिय शेतीमध्ये जीवाणू इत्यादी असतात, जे माती आणि वनस्पती या दोघांनाही कायमस्वरूपी शक्ती प्रदान करतात. शेण, कचरा, झाडाची पाने इत्यादींच्या दीर्घ प्रक्रियेनंतर सेंद्रिय खत तयार केले जाते. त्यात पिकांचे पोषण करणारे जीवाणू असतात. त्या उलट रसायनांमध्ये जीवन नसते, तर ज्यामध्ये जीवन असते ते देखील मरतात.

सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात नाहीत. सेंद्रिय शेतीमध्ये बाह्य वस्तूंचा वापर खूपच कमी असतो. जिथे रासायनिक खतांमुळे माती, चारा आणि अन्नधान्य यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तिथे सेंद्रिय खतांमुळे त्याचे प्रमाण वाढते. ज्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर केला जातो त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते आणि पिकांना पाणी कमी द्यावे लागते. सेंद्रिय शेती केल्यास शेतकर्‍यांचा खर्च ८० टक्क्यांहून अधिक कमी करता येतो. हळूहळू सेंद्रिय शेतीकडे आल्याने पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता दोन्ही वाढते.

Exit mobile version