सोयाबीन व हरभर्‍याकडून शेतकरी पुन्हा एकदा ऊसाकडे

Sugarcane-growers

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयापर्यंत वाढला होता तो गतवर्षी घसरत साडेसात हजार व आता पाच हजारांच्या खाली आला आहे. हरभर्‍याला शासनाने हमीभाव जाहीर केला तरी बाजारपेठेत हमीभावाने हरभरा विकला जात नाही. त्यामुळे शेतकर्‍याला हमीभावापेक्षा कमी भावाने हरभरा विकावा लागतो आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन व हरभर्‍याकडून पुन्हा एकदा ऊसाकडे वळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील शेतकरी सोयाबीन, तूर व हरभरा हे नगदी पिके घेत होता आता ही पिके घेणे परवडनासे झाले आहे. कारण पिकाचा लागवडीचा खर्च, काढणीचा खर्च, फवारणी हा दरवर्षी वाढतो आहे व उत्पादकताही कमी होत आहे. त्यातुलनेत गेल्या काही वर्षांत ऊसाला चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे गतवर्षी उसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आता पुन्हा रब्बी हंगामापासून ऊस लागवडीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version