क्लस्टरच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा माल थेट परदेशात

agriculture-export-clusters

शेत शिवार । नवी दिल्ली : कृषी क्षेत्रासाठी पहिल्यांदाच देशाच्या विविध विभागीय क्षेत्रांमधून (क्लस्टर) ही निर्यात झाली आहे. ताज्या भाज्या आणि आंब्यांची निर्यात वाराणसीहून, आणि काळ्या तांदळाची निर्यात चंदौली इथून निर्यात केली गेली. त्याचा थेट लाभ तिथल्या शेतकर्‍यांना मिळाला गेला. नागपूरच्या संत्र्याचीही तिथूनच थेट निर्यात करण्यात आली.

वर्ष २०२०-२१मध्ये, तृणधान्याच्या निर्यातीतही प्रगती झाली. भारताने या काळात एकाचवेळी अनेक देशांमध्ये निर्यात केली, उदाहरणार्थ, पहिल्यांदाच तांदळाची निर्यात, तिमोर-लास्ते, पुरेतो रिको, ब्राझील इत्यादी देशांमध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे, गव्हाची निर्यात, येमेन, इंडोनेशिया, भूतान इत्यादी देशांमध्ये आणि इतर, तृणधान्ये, सुदान, पोलंड आणी बोलिव्हिया सारख्या देशात पाठवण्यात आलीत.

कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहकार्याने बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संबंधित विभाग प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये डाळिंबासाठी, अर्जेटिनामध्ये आंबा आणि बासमती तांदूळ; इराणमध्ये गाजर बियाणे; उझबेकिस्तानमध्ये गव्हाचे पीठ, बासमती तांदूळ, डाळिंबाचे बीज, आंबा, केळी आणि सोयाबीनची पेंड ; भूतानमध्ये टोमॅटो, भेंडी आणि कांदा; आणि सर्बियामध्ये संत्री यासाठी भारताला अलीकडेच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये सर्वात पहिल्या कृषी निर्यात धोरणाची आखणी केली. या धोरणाच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांनी राज्य-विशिष्ट कृती योजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. २५ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य पातळीवरील परीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे.

२८ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांनी कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित नोडल संस्थांची नावे निश्चित केली आहेत. कृषी निर्यात धोरणाच्या भाग म्हणून, कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ४६ विशिष्ट उत्पादने-जिल्हे यांच्या समूहांची निश्चिती करण्यात आली आहे. विविध समूहांमध्ये समूह पातळीवरील २९ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

या काही यशोगाथा :

नागपूर क्लस्टर (संत्री ): ११५ मेट्रिक टन नागपूर संत्री आणि अंबियाबहार हंगामातील ४५ मेट्रीक टन संत्री (प्रथमच) समुद्रमार्गे मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात करण्यात आली आणि मोठी सुपरमार्केट्स म्हणजेच लुलू सुपर मार्ट, सफारी मॉल, नेस्टो इत्यादी मध्ये पुरविण्यात आली.

डाळिंब क्लस्टर : महाराष्ट्र – वर्ष २०२०-२१.मध्ये सोलापूर क्लस्टरमधून ३२,३१५ मेट्रिक टन डाळिंबाची निर्यात करण्यात आली.

केळी क्लस्टर :  महाराष्ट्र – वर्ष २०२०-२१. दरम्यान केळीचे सोलापूरहुन ३२७८ , जळगावहून २८० आणि कोल्हापूर येथून ९० कंटेनर निर्यात करण्यात आले आहेत.

कांदा क्लस्टर : महाराष्ट्र – जानेवारी ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत, दक्षिण पूर्व आशिया, मध्य पूर्व देश, बांगलादेशमधील विविध ठिकाणी १०,६९७ मेट्रिक टन ताज्या कांद्याची निर्यात करण्यात आली.

द्राक्षे क्लस्टर : महाराष्ट्र – वर्ष २०२०-२१. दरम्यान आतापर्यंत ९१,७६२ मेट्रिक टन ताज्या द्राक्षांचे ६७९७ कंटेनर्स नाशिक क्लस्टर जिल्ह्यातून युरोपियन युनियनला निर्यात करण्यात आले आहेत. सांगली क्लस्टर जिल्ह्यातून युरोपियन युनियन आणि इतर देशांमध्ये १३,८८४ मेट्रिक टन द्राक्षाचे १०१३ कंटेनर आणि मनुकांचा एक कंटेनर निर्यात करण्यात आला आहे.

Exit mobile version