महाराष्ट्रातील शेतकरी पाच वर्षांनंतर पुन्हा करणार आंदोलन; वाचा काय ठरले पुणतांब्याच्या बैठकीत

Success farmer

अहमदनगर : सन २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी संपानंतर पाच वर्षांनी शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत. यंदाही पुणतांबा हेच आंदोलनाचे केंद्र आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात शेतकरी आंदोलनाबाबत नुकतिच एक बैठक पार पडली यावेळी आंदोलनाचा निर्धार करण्यात आला. लवकरच ग्रामसभा घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच कमिटी निवडीसाठी २३ मे रोजी बैठकआयोजित करण्यात आली आहे.

शेतकरी मालाला बाजारभाव, शिल्लक राहिलेला ऊस, कांद्याचे गडगडले भाव, दुधाला रास्त भाव द्यावा यासाठी शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसणार आहेत. कांदा, ऊस, गहू, दुधाचे दर कायम राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात उभे राहून आयात निर्यातवर नियंत्रण राहिले पाहिजे. असा सुर या बैठकीत उमटला. लवकरच या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

मागील आंदोलनात अपरिपक्व होतो, आता परिपक्व होऊन आंदोलन करण्यात येईल, असा विश्‍वास डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, धनंजय धोर्डे, विठ्ठलराव जाधव, चंद्रकांत वाटेवर, नामदेवराव धनवटे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष कुलकर्णी, दत्तात्रय धनवटे, सर्जेराव जाधव, राजेंद्र थोरात, अनीलराव नले, बाळासाहेब भोरकडे यांनी व्यक्त केला आहे.

या आहेत मागण्या
१) कारखान्यांनी परिसरातील ऊस शिल्लक राहू देऊ नये,जो ऊस राहील त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने त्याच्या साठी काढलेले कर्ज, खर्च, शासनाने करावा.
२) पूर्ण दाबाने दिवसा वीज पुरवठा शासनाने करावा.
३) उसाला दोन लाख अनुदान,कांद्याला २०००रुपये नाफेडने हमी भाव शेतकर्‍यांना मुबलक खते, कर्ज माफीची, अमलबजावणी झाली पाहिजे.
४) शेतकर्‍याचा प्रश्न आज तयार झाला नसून घटनेतील परिशिष्ट नऊ रद्द, शेतकर्‍यांना शेतीमालाचे भाव व वेतन आयोगाचा ताळमेळ बसविणे, शिल्लक ऊस बाबत साखर संघाने नियोजन करणे.

Exit mobile version