शेतकर्‍यांमुळे तरली देशाची अर्थव्यवस्था; वाचा सविस्तर

Success farmer

नवी दिल्ली: कोरोना काळापासून अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अद्यापही दूर झालेली नाही. लॉकडाऊनच्या संकटसमयी शेती व शेतकर्‍यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरले होते. आता २०२२-२३ मध्येही शेती व शेतकर्‍यांमुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली आहे. ‘डीजीसीआयएस’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या काळात भारताची कृषी निर्यात २३ अब्ज डॉलर म्हणजेच १.९९ लाख कोटी रुपये राहिली. मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ती २० टक्के अधिक आहे.

देशातील नागरिकांना अन्नधान्य पुरवठा कमी पडू नये यासाठी केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आटा, मैदा, रवा आणि तुकडा बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. साखरेच्या निर्यातीवर १.१२ कोटी टनांची मर्यादा घालण्यात आली तरीही २०२२-२३ मध्ये भारताची कृषी निर्यात २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

निर्यातीवर निर्बंध घातल्याने केंद्र सरकारने निर्धारित केलेले ४७० अब्ज डॉलर म्हणजे ३८.५ लाख कोटी रुपयांचे निर्यात लक्ष्य गाठण्यास अडथळे येणार आहेत. निर्बंध घातल्यानंतरही सणासुदीमध्ये गव्हाच्या किमतीत चार टक्क्यांची वाढ झाली आहे, तर बासमती तांदळाची किंमत १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ पाच टक्क्यांनी स्वस्त झाला आहे.

Exit mobile version