‘लिंकिंग’मुळे शेतकरी त्रस्त

fertilizer

भंडारा : जून महिना निम्मा उलटला तरी पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. यामुळे खरिपाबाबत चिंतेचे ढग आहेत हे कमी म्हणून की काय खत वावरात टाकण्यापूर्वीच लिंकिंगच्या नावाखाली शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. युरियाच्या खताबरोबर इतर खते घेण्याची अट कृषी केंद्र चालकांकडून केली जात आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍यांनी आर्थिक लूट देखील होत आहे. Farmers suffer due to Linking

खरीप हंगामात युरियाला मोठी मागणी असते. युरियाची एक बॅग घेण्यासाठी शेतकर्‍यांना २७० रुपये मोजावे लागतात. मात्र पैसे दिल्यानंतरही शेतकर्‍यांना इतर एका १५० रुपयांपर्यंतच्या लिक्विड खताची खरेदी ही करावीच लागते याला लिंकिंग पध्दत म्हणतात.

याबाबत कृषी विभागाकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा असतांना केवळ पोकळ आश्‍वसने देण्यातच धन्यता मानली जात आहे. खत कंपन्यांबरोबर बैठका घेऊन हा विषय मार्गी लावला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात जवळपास सर्वच शेतकर्‍यांनी अशा प्रकार खत खरेदी केली आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खत कंपन्या शेतकर्‍यांची लूट करीत आहेत. आणि कारवाई बाबत कृषी विभाग उदासिन असल्याने याचे प्रमाण वाढत आहे.

Exit mobile version