ट्रॅफिकजॅममुळे शेतकर्‍यांनी सफरचंद रस्त्यावर फेकले

apple 1

मुंबई : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने रस्त्यावर कांदा, टमाटे किंवा पालेभाज्या फेकणारे शेतकरी अनेकांनी पाहिले आहेत. मात्र टॅफिकजॅममुळे शेतमाल रस्त्यावर फेकून दिल्याने ऐकवित नाही. मात्र हे चित्र कश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी पहायला मिळाले. सफरचंद उद्योग हा काश्मीरचा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. आधी हा उद्योग अडचणीत असतांना सफरचंदांनी भरलेले हजारो ट्रक श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर अडकून पडल्याने सफरचंद सडू लागले. यास राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वाहतूक व्यवस्थापन जबाबदार असल्याचा संताप शेतकर्‍यांनी केला. या निषेधार्थ फळे पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्‍या पेट्या जाळत सफरचंद देखील रस्त्यावर फेकून दिले.

काश्मीरमध्ये वार्षिक सरासरी १.५-१.८ दशलक्ष मेट्रिक टन सफरचंदाची कापणी होते, जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या ७५ टक्क्यांहून अधिक आहे. यावर्षी, पीक चांगले आले आहे आणि उत्पादन २.१ दशलक्ष मेट्रिक टन इतके आहे. आवक जास्त झाल्यामुळे किंमती घसरल्या आहेत. या संकटात भर म्हणून वाहतूक व्यवस्थापन कोलमडले आहे. सोपोर फ्रूट मंडीचे अध्यक्ष फयाज अहमद मलिक यांचे म्हणणे आहे की, दररोज सुमारे ८,०००-१०,००० फळांनी भरलेले ट्रक दिवसेंदिवस महामार्गावर विनाकारण थांबलेले असतात. ट्रक एकाच वेळी सोडले जातात.

त्यामुळे फळे महामार्गावर अडकलेल्या ट्रकमध्ये सडत आहेत. परिणामी बाजारपेठेतील दर आणखी खाली येतात. दुसर्‍या बाजूला दर घसरण्याचे दुसरे कारण म्हणजे, इराणी सफरचंदाची बेकायदेशीर आयात! इराणी सफरचंद दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराअंतर्गत अफगाणिस्तानमधील फळांच्या वेशात असल्याने आयात शुल्काशिवाय भारतात प्रवेश करत असल्याचा आरोप फळ उत्पादकांनी केला आहे.

Exit mobile version