शेतकर्‍यांना मोबाईवर तपासता येणार दुकानातील खतसाठा

farmer 1

पुणे : ऐन हंगामात केली जाणारी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, लिंकींग, बच्चूच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट यासारख्या कटकटीतून आता शेतकर्‍यांची सुटका होणार आहे. कारण तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात खतांचा साठा किती शिल्लक आहे? याची माहिती शेतकर्‍यांना त्यांच्या मोबाईलवर कळणार आहे. यामुळे व्यापार्‍यांना खोटी माहिती देवून शेतकर्‍यांची लूट करता येणार नाही.

मोदी सरकारने www.fert.nic.in अशी एक वेबसाईट तयार केली आहे. त्यात कोणत्याही राज्यातील खतांच्या साठ्याची अचूक माहिती शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे. कोणत्या कृषी सेवा केंद्राला किती पुरवठा केला गेला, विक्री किती झाली व शिल्लक किती आहे. शिवाय खरिपात कोणत्या पिकासाठी किता खाताचे नियोजन करण्यात आल्याची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

अशी घ्या खत साठ्याची माहिती
या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला फर्टिलाटझर डॅशबोर्ड (Fertilizer Dashboard)असा पर्याय दिसेल. त्यावर क्‍लिक केल्यावर ई-उर्वरक (e-Urvarak) असे पेज ओपन होईल. या पेजवर देशात किती खत विक्रेते आहेत. कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत किती खतांची विक्री झाली आहे. याची आकडेवारी मिळेल. याच पेजवर फार्मर कॉर्नर असे बटन दिसेल. त्यावर क्‍लिक केल्यावर संबंधित जिल्हा, संबंधित कृषि सेवा केंद्राचा नोंदणी क्रमांक किंवा नाव याची माहिती टाकल्यावर त्या दुकानात किती खतसाठा शिल्लक आहे, याची माहिती उपलब्ध होईल.

Exit mobile version