पिकांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना मिळणार अनुदान; जाणून घ्या सविस्तर

indian currency

पुणे : शेतकर्‍याच्या मेहनतीमुळे शेत शिवारात पिकं डोलतं असतांना ऐनवेळी पिकांना विविध किडरोगांचा प्रादूर्भाव होतो व शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. कीड रोगांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतो मात्र अनेकवेळा त्याचाही फायदा होईलच, याची शाश्‍वती नसते. शेतकर्‍यांची ही अडचणी लक्षात घेवून कृषी विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता पिकांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांना १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

कृषी विभागाच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कीड नियंत्रणासाठी शेतकर्‍यांना स्वखर्चानेच शेतात कामगंध सापळे लावावे लागत असत. आता मात्र, सरकारी यंत्रणाच १०० टक्के अनुदानावर सापळे वाटणार आहे. त्यामुळे पिकांचे रक्षण तर होईलच शिवाय शेतकर्‍यांचा होणारा खर्चही वाचणार आहे.

खरीप हंगामातील पिकांवर कीडरोगराईची काय अवस्था आहे याचा अभ्यास आता कृषी विभागाकडून केला जाणार आहे. कापसामध्ये तर कामगंध सापळे हे असणे गरजेचेच आहे. जर शेतकर्‍यांनी सापळे लावले नाहीत तर निवडलेल्या शेतात सापळे बसविणे व त्याची खरेदी करण्याची जबाबदारी ही कृषी सहयकांवर असणार आहे. राज्यात आता १०० अनुदनावर सापळे उपलब्ध करुन देण्यास कोणतीच हरकत नसल्याचे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. गेल्या हंगामातील दरानुसार सापळे खरेदी करण्याच्या सूचना कृषी सहायकांना देखील देण्यात आल्या आहेत. जर शेतकर्‍यांनी आगोदरच सापळ्यांची खरेदी केली असेल तर अशा शेतकर्‍यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीतून त्याच दराने अनुदान दिले जाणार आहे. यामुळे मात्र, स्थानिक पातळीवर यंदा कामगंध सापळे बसवण्याच्या मोहिमेचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

Exit mobile version