उत्पादन वाढविण्यासाठी हंगामाच्या अंतिम टप्प्यात असे करा व्यवस्थापन

Rabbi-season

मुंबई : सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत योग्य व्यवस्थान केल्यास उत्पादन हमखास वाढते. यादृष्टीने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने शेतकर्‍यांना सल्ला दिलेला आहे.

सध्याचे तापमान, वार्‍याचा वेग आणि धान्याची असलेली अवस्था पाहता एक पाणी पिकांना दिले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, अधिकचा वारा असताना जर पिकांना पाणी दिले तर पडझड होणार आहे. त्यामुळे हवामान पाहूनच पाऊल उचलणे गरजेचे आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे गहू काळवंडण्याचा धोका असतो. अशा प्रसंगी पिकास डायथेन एम-४५ हे ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १.० ग्रॅम हे लीटर पाणी मिसळून फवारणी करावी लागणार आहे. तर दुसरीकडे मोहरीच्या शेंगा परिपक्व झाल्यास काढणीला सुरवात करावी लागणार आहे. शेंगा पक्व होऊनही अधिकचे काळ मोहरी वावरात राहिली तर शेंगगळतीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे लवकर कापणी आणि मळणी ही महत्वाची आहे.

मूग पेरणीसाठी या वाणाची निवड करा

मूग पिकाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांनी सुधारित बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादनही वाढते आणि पीक जोमात बहरते. मूग-पुसा विशाल, पुसा रत्न, पुसा-५९३१, पुसा बैसाखी, पी.डी.च.-११, एसएमएल-३२, एसएमएल-६६८, सम्राट यापैकी एका वाणाची निवड केली तरी उत्पादनात भर पडणार आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांवर रायझोबियम आणि फॉस्फरस विद्रव्य जीवाणूंद्वारे बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. पेरणीच्या वेळी शेतजमिनीत ओल असणे आवश्यक असते.

Exit mobile version