केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून कापसाचे चार वाण विकसित

cotton

नागपूर : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने महाराष्ट्रासाठी अधिक लांब धागा असलेले, तर दक्षिण विभागासाठी गर्द तपकिरी रंगाचे नवे कापूस वाण संशोधित केले आहे. हे दोन्ही वाण केंद्र सरकारकडून नोंदणीकृत झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आलेले ‘सुरक्षा’ हे वाण नॉन बीटी आहे. या सरळ वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या धाग्यांची लांबी ही ३२ मि.मी.आहे. १६० दिवसांत हे वाण परिपक्व होत असून, हेक्टरी उत्पादकता २३ क्विंटल मिळते.

दक्षिण भागासाठी ‘वैदेही-१’ हे रंगीत कापसाचे वाण विकसित करण्यात आले आहे.
सिंचन सुविधा असल्यास या कापसाची उत्पादकता २० क्विंटल, तर कोरडवाहू भागात १५ क्विंटल इतकी मिळते.
‘बीजी-१’ या जीनचा अंतर्भाव असलेले दोन बीटी वाण ही संस्थेने विकसित केली आहेत. त्यामध्ये ‘बीटी-९’ आणि ‘बीटी-१४’ यांचा समावेश आहे.

Exit mobile version