शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन दरात वाढ

good news for farmers soybean price increase

लातूर : गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या जवळपास स्थिरावले होते. त्यामुळे संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनची आता कवडीमोल दराने विक्री होणार की काय अशीच अवस्था झाली होती. यामुळे अनेकांना मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला मात्र, ज्या शेतकऱ्यांनी संयम पाळला आता त्यांना त्याचे फळ मिळणार असल्याचे चित्र आहे.

सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे तर उडदाच्या दरात आता चढ-उतार होत आहे. शेतकऱ्यांना जे अपेक्षित होते तेच आता बाजारपेठेत होताना दिसत आहे. मात्र, हे दर काही दिवसापूरतेच तर नाहीत ना म्हणून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत नसला तरी सलग पाचव्या दिवशी सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. वाढत्या मागणीमुळे दरात वाढ होत आहे. यंदा पावसाचा परिणाम सोयाबीनवर झालेला आहेच. शिवाय सोयाबीन मळणीच्या दरम्यानही मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला घेऊन जाण्यापूर्वी ऊनामध्ये वाळवणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा दर्जा सुधारणार आहे. शिवाय आर्द्रतेचे प्रमाण हे 10 ते 12 असल्यावरच विक्रीसाठी घेऊन जाणे फायद्याचे ठरणार आहे.

गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजाराच्या जवळपास स्थिरावले होते. त्यामुळे संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनची आता कवडीमोल दराने विक्री होणार की काय अशीच अवस्था झाली होती. यामुळे अनेकांना मिळेल त्या दरात (Soybean Sale) सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला मात्र, ज्या शेतकऱ्यांनी संयम पाळला आता त्यांना त्याचे फळ मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण 6 हजार रुपयांपर्यंत आलेले सोयाबीन आता 6 हजार 300 वर येऊन ठेपले आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी सोयाबीनला पोटलीतला दर हा 6 हजार 300 असा होता. गेल्या दीड महिन्यातील हा उच्चांकी दर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात दिसणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी दर वाढले असले तरी आवक मात्र 18 हजार पोत्यांची झाली होती.

पुन्हा आशादायी चित्र
हंगामात अनेक वेळा सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिकाही यासाठी जबाबदार ठरलेली आहे. सोयाबीनला चांगला दर असतानाच विक्री अन्यथा साठवणूक यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन 4 हजार 500 रुपये क्विंटल होते. मात्र, दिवाळीनंतर यामध्ये वाढ होऊन 6 हजार 500 पर्यंत दर गेले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून 6 हजावरच सोयाबीन हे स्थिरावले होते. त्यामुळे आता दरात वाढ होते की नाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. अखेर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीन हे 6 हजार 300 वर गेले असून दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

10 दिवासांमध्ये 500 रुपयांची वाढ
ज्याप्रमाणे दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात दिवसाला घसरण होत होती तेच चित्र आता उलटे झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सलग सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. तर गेल्या 10 दिवसांमध्ये चक्क 500 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय पावसामुळे सोयाबीन डागाळलेले असतानाही हे दर मिळत आहेत हे विशेष. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक आहे. यातूनच नुकसान होणार असेल तर शेती खर्च आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. आता दर वाढत असताना देखील टप्प्याटप्प्याने सोयाबीन बाजारात आणले जात आहे.

दर वाढत असतानाही आवक मात्र मर्यादीतच
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सोयाबीनला सौद्यात 5800 चा दर मिळाला तर पोटलीत 5500 प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाले आहेत. सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. असे असताना मात्र, 9 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. अचानक आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावर होईल म्हणून शेतकरीही सावध भूमिका घेत आहेत. शिवाय भविष्यात दरवाढीचे संकेत देण्यात आल्याने शेतकरी अजूनही साठवणूकीच्याच तयारीत आहे.

Exit mobile version