एमएसपी संदर्भात सरकारचे ठोस पाऊल; ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

msp

नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीवर (MSP) स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीची पहिली बैठक माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. एमएसपीवरील समितीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी चार गट तयार केले आहेत. पहिल्या बैठकीत, भविष्यातील गरजांसाठी मूल्य साखळी विकास आणि संशोधनाद्वारे भारतीय नैसर्गिक शेती प्रणाली अंतर्गत क्षेत्र विस्तारासाठी कार्यक्रम आणि योजनांवर सूचना केल्या. नैसर्गिक शेती प्रक्रिया आणि उत्पादनांसाठी शेतकरी अनुकूल पर्यायी प्रमाणपत्र आणि विपणन प्रणालीची पद्धतशीर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

असे असतील चार गट
पहिला गट : पहिला गट हिमालयीन राज्यांसह पीक पद्धती आणि पीक वैविध्य आणि त्या राज्यांमध्ये एमएसपीचे समर्थन कसे सुनिश्चित करता येईल याचा अभ्यास करेल.
दुसरा गट : आयआयएम-अहमदाबादचे सुखपाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सूक्ष्म सिंचन शेतकरी केंद्रित करण्यासाठी अभ्यास केला जाईल. सध्या शासनाच्या अनुदानावर सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी शेतकर्‍यांकडून मागणी कशी निर्माण करता येईल, याची तपासणी गट करणार आहे.

तिसरा गट : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंटच्या प्रतिनिधीच्या नेतृत्वाखालील तिसरा गट सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतींसह झिरो बजेट बेस्ड फार्मिंग चा अभ्यास करेल.
चौथा गट : चौथ्या गटाचे नेतृत्व इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सोबत हैदराबादस्थित सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड अ‍ॅग्रीकल्चर आणि नागपूरस्थित नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग आणि देशभरातील पीक शेतीसाठी आणखी एक संस्था. विविधीकरण आणि पीक पद्धतीचा अभ्यास करेल आणि पार्श्‍वभूमी अहवाल सादर करेल.

Exit mobile version