हरभरा उत्पादक शेतकर्‍यांचे ‘या’ कारणामुळे होतोय प्रतिक्विंटल ७०० रु. तोटा

Gram harbhara

नाशिक : राज्यात हरभर्‍याची नाफेडकडून प्रतिक्विंटल ५,२३० रुपये या हमीभावाने खरेदी सुरू होती. मात्र, नाफेडने राज्यातील सर्व खरेदी केंद्रे बंद केली आहेत. हरभरा खरेदीचे उद्दिष्ठे पूर्ण झाल्यामुळे ही खरेदी थांबविण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. खुल्या बाजारात हरभर्‍याचे दर ४२०० ते ४८०० रुपयांपर्यंत आहेत. या भावाने हरभरा विकला तर शेतकर्‍यांना क्विंटलमागे सरासरी ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

राज्यात २०२१-२२ च्या रब्बी हंगामात हरभर्‍याचे तब्बल २७. ५६ लाख टन उत्पादन झाले. नाफेडने शासकीय योजनांसाठी लागणारा केवळ ६.८० लाख टन हरभरा खरेदी केला. उर्वरित २०.७६ लाख टन हरभरा शेतकर्‍यांकडे पडून आहे. नाफेडने खरेदी बंद करताच खुल्या बाजारात हरभर्‍याचे भाव कोसळले. बाजारात सध्या सरासरी ४,५०० रुपये दराने हरभरा खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल तब्बल ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाच वर्षांपूर्वी तूर उत्पादकांचे हाल झाले होते. यंदा हरभरा उत्पादकांची तशीच परवड होतेय. नाफेडने एकूण हरभरा उत्पादनापैकी अवघा पाचवा हिस्साच खरेदी करून खरेदी केंद्रे बंद केली. ३ राज्यात २०.७६ लाख टन हरभरा शेतकर्‍यांकडे पडून आहे. दोन दिवसांपूर्वी नाफेडमध्ये ५,२३० रुपयांनी जाणारा हरभरा आता बाजारात ४५०० रुपयांप्रमाणे विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली.

Exit mobile version