नाशिक नव्हे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून झाली ८ हजार टन द्राक्षाची निर्यात

grapes-export

मुंबई : द्राक्ष उत्पादकांसाठी यंदाचे वर्ष नुकसानीचेच ठरले आहे. अगदी लागवडीपासून थेट काढणीपर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा व त्यामुळे निर्माण झालेल्या कीड रोगांमुळे द्राक्षांच्या उत्पादनात मोठी घट झाली. असे असतांना सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत ८ हजार टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली आहे.

चीनमध्ये द्राक्षाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यंदा मात्र, हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्यांनी अपेडाकडे काही नियम-अटी घातल्या होत्या. त्याची पूर्तता झाल्याशिवाय द्राक्षाची निर्यात शक्य नव्हती. मात्र, नियमांचे पालन हे शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यात विकास एजन्सी अर्थात अपेडा यांनी केली नाही. त्यामुळे हंगाम मध्यावर असताना एकही ट्रक चीनकडे मर्गस्थ झालेला नव्हता. आता ही समस्या दूर झाली असून सांगली जिल्ह्यातून पहिली ट्रक ही मार्गस्थ झाली आहे.

चीनच्या अटींचा होता अडथळा

द्राक्ष आयात करण्यापूर्वीच चीनने काही नियम-अटी घातल्या होत्या. यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योजकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काय काळजी घ्यावयाची हे सांगितले होते. या सर्व बाबींचे चित्रीकरण करुन संबंधीत यंत्रणेला पाठवायचे होते. मात्र अपेडाने असे काही केले नाही. त्यामुळे द्राक्षाची निर्यात होऊ शकलेली नव्हती. पण आता निर्यात सुरु झाली आहे.

Exit mobile version