गोड बातमी : हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात

hapus mango

रत्नागिरी : गत काही दिवसांपूर्वी तीन ते साडेतीन हजार रुपयांनी मिळणारी हापूस आंब्यांच्या एका पेटीची किंमत एक ते दीड हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे अगदी १५० ते ४०० रुपयांना एक डझन आंबे मिळू लागले आहे. हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने आता मध्यमवर्गीय ग्राहक देखील बदाम, केशरी, लंगडा आंब्याऐवजी हापूसची चव चाखू लागले आहे.

फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बाजापेठेत मोठी मागणी असते मात्र यंदा उत्पादनात झालेली घट वाढती मागणी या गणितामुळे अक्षय्यतृतियेपासून हापूस आब्यांचे दर जरा आवाक्याबाहेरच होते. मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजारात हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. यामुळे हापूसचे दर खाली आले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूसची एक पेटी ही ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात होती. आता आवक वाढल्याने हीच पेटी १ हजार ते २ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे.

देवगड हापूस आंब्याचा हंगाम लवकर सुरु झाला होता. शिवाय उत्पादनातही घट झाली होती त्यामुळे २० मे पर्यंत हंगाम संपेल असा अंदाज आहे तर दुसरीकडे रत्नागिरी हापूसचा हंगाम हा ३० मे पर्यंत अटोक्यात येईल असा अंदाज आहे. २० मे नंतर मात्र, गुजरात येथील हापूस, केशर आणि राजापूरी आंब्याचा हंगाम सुरु होणार आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात जुन्नर हापूस मार्केटमध्ये येणार आहे.

Exit mobile version