माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नीरा भीमा कारखान्याचे सात लाख टन गाळप पूर्ण

harshvardhan patil nira bhima factory

इंदापूर : कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप वेळेवर पूर्ण झाले आहेत. चालू गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख १७ हजार टन उसाचे गाळप करून कारखान्याच्या इतिहासामध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. पुढील गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप केले जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.

शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू हंगाम २०२१-२२च्या २१ व्या यशस्वी गळीत हंगामाची सांगता शनिवारी (ता.९) गव्हाण पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी गव्हाण पूजन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, ॲड कृष्णाजी यादव,
दत्तात्रेय शिर्के, दिनू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यामध्ये प्रतिदिनी ३५०० टन गाळप क्षमता असणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये नीरा भीमा कारखान्याने ऊस गाळप व उपपदार्थ निर्मितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यामध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे. चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम तोडणी मजूर, कर्मचारी, हितचिंतक आदी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील गळीत हंगामामध्ये ८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट  ठेवले आहे,’ असे ते म्हणाले. शेतकी अधिकारी डी. एम. लिंबोरे यांनी प्रास्ताविक केले. प्र. कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी आभार मानले.

Exit mobile version