सीताफळ वाईनची चव घेतली आहे का?

sitafal wine

अकोला : सीताफळ हे फक्त खाण्यासाठी वापरले जाणारे चविष्ठ फळ आहे, असा आजवरपर्यंत अनेकांचा समज होता. मात्र आता सीताफळापासून कुल्फी व वाईन देखील तयार केली जावू लागली आहे. प्रायोगित तत्वावर तयार करण्यात आलेल्या सीताफळ वाईनेचे अकोला येथे झालेल्या सीताफळ कार्यशाळेत नुकतेच सादरिकरण करुन त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले.

सीताफळ गराचा उपयोग प्रामुख्याने आइस्क्रीम, कुल्फी, सीताफळ शेक, बासुंदी यासाठी होतो. मध्यंतरी कोरोना संकटामुळे सीताफळ गराची विक्री ठप्प झाली होती. गराची साठवणूक उणे २० अंशावर करावी लागत असल्याने या प्रक्रिया उद्योजकांना जवळपास २०० कोटी रुपयाचे नुकसान झेलावे लागले. त्यामुळे या गराचा अधिक कार्यक्षम उपयोग करता यावा यासाठी सीताफळ महासंघाने पुढाकार घेऊन विंचूर (नाशिक) येथील सुला वाइन फॅक्टरीमध्ये गर पाठवत सीताफळाची वाइन करण्याचा प्रयोग सहा महिन्यांपूर्वी करण्यास सुरुवात केली. प्रायोगिक तत्त्वावर तयार झालेल्या वाइनचे १७ व्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळेचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी म्हणाले, सीताफळाची वाढती लागवड व उत्पादन लक्षात घेऊन सीताफळ महासंघ प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धनासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नरत आहे. सीताफळ या नाशवंत फळांच्या प्रक्रियेचे थोडेफार काम सासवड, पुणे व मुंबई भागात काही प्रमाणात सुरू होते. परंतु योग्य मिशनरी उपलब्ध नसल्याने गरापासून बिया वेगळे करण्याचे काम मजुरांकडून हाताने करण्यात यायचे. तेथे स्वच्छता व हायजिनची मोठी समस्या होती. ही बाब माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांच्या निदर्शनात आणून दिली. सतत पाच वर्षे पाठपुरावा करून सीताफळ बीज निष्कासन यंत्राची निर्मिती करून घेतली आहे. यामध्ये ७० टक्के समाधानकारक काम होत आहे. जवळपास ८० ठिकाणी सीताफळ प्रक्रिया केंद्र वेगवेगळ्या स्तरावर सुरू झालेले आहे व लवकरच ही संख्या २०० पेक्षा अधिक करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version