अरे देवा, ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षबागा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

nashik-grapes-export

सांगली : आधी झालेल्या अविवृष्टीतून कसेबसे सावरत असतांना आता परतीच्या पावसामुळे शेतीपीकांना मोठा फटका बसला आहे. सांगली व नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबांगाचेही यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळछाटणी झालेल्या द्राक्ष बागावर दावण्या या बुरशीजन्य रोगाचा हल्ला झाला असून काढणीला आलेले सोयाबीन, भाजीपाला पाणी साचल्याने हातचे गेले आहे.

सांगली जिल्ह्यात काही द्राक्ष बागांच्या छाटण्या पूर्ण झाल्या असून या बागेतील द्राक्ष घड पोंगा अवस्थेत आहे, तर काही बागामध्ये कळी अवस्थेत आहेत. सततच्या पावसाने दावण्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. बागेच्या एखाद्या कोपर्‍यातील पानावर दिसणारा दावण्या रोग २४ तासांत सर्व बागेत पसरू शकतो, तर ४८ तासांत कोवळ्या घडावर आक्रमण होऊन संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी महागडी औषधे फवारली, तरी पावसाने उपयोग शून्य ठरत असल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे.

ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता अपेक्षित असताना पहाटेपासून पावसाची उघडझाप सुरू राहते. दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने पिकांनाही नुकसानकारक ठरत आहे. द्राक्ष व ऊसासह काढणीला आलेल्या सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, उडीद पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने काढणीसाठी संधीच मिळेना झाली असून पावसाने सोयाबीनच्या शेंगा जागेवर फुटत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Exit mobile version