पक्षी थांब्यांमुळे किडींपासून पिकांचे संरक्षण कसे होते?

bird crope

जळगाव : किडींपासून पिकांचे होणारे नुकसान ही शेतकर्‍यांची मोठी डोकंदूखी असते. किडींपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांच्या वापरासह अन्य पर्यायांचा वापर करतो. यापैकीच एक म्हणजे शेतात पक्षाथांबे उभे करणे! हानिकारक किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यामध्ये पक्षांची महत्वाची भुमिका आहे. हा अत्यंत फायदेशिर मार्ग असला तरी अनेक शेतकर्‍यांना पक्षीथांब्यांचे महत्त्व अजूनही लक्षात आलेले नाही. यामुळे पक्षी थांब्यांमुळे किडींपासून पिकांचे संरक्षण कसे होते? याची माहिती आज आपण समजून घेणार आहोत.

गायबगळे, वेडा राघू, खाटीक, कोतवाल यासारखे अनेक पक्षी शेतांमधील अळ्या व किडी वेचून खातात. कृषी तंज्ञांच्या मते सुमारे ३३ % नियंत्रण पक्षांमार्फत होऊ शकते. यामुळे पक्षांना आकर्षित करणेसाठी शेतात पक्षी थांबे उभारावेत. पक्षांना जर किडी, अळ्या उपलब्ध झाल्या तर ते धान्य पिकाचे नुकसान करीत नाहीत. पक्षांपासून होणारा फायदा पाहता काही प्रसंगी पक्षांपासून होणारे नुकसान गौण ठरते. यामुळे शेतात पक्षीथांबे उभारणे आवश्यक असते.

पक्ष्यांना शेतात आकृष्ट करण्याच्या पद्धती
१) पिकासोबत सुर्यफुल, मका, ज्वारीचे काही दाने मिसळून पेरावे. कपाशीच्या किंवा हरभराच्या शेतात तुरळक ठिकाणी दोन-तीन दिवसांच्या अंतराने सकाळी लवकर पक्ष्यांना दिसेल एवढ्या उंचीवर भात ठेवावा. तो खाण्यासाठी पक्षी जमा होऊन पिकावरील किडी खातात.
२) शेतात १५ ते २० मीटर अंतरावर दोन वासे उभे करून त्यांच्या वरच्या टोकावर दोरी बांधावी.
३) शेतात टी आकाराचा लाकडी अँटेना उभे केल्यास पक्ष्यांना बसण्यास जागा उपलब्ध होते.
४) शेतात एक-दोन ठिकाणी उंचावर रुंद तोंडाची मडकी बांधून त्यात रोज ताजे थंड पाणी भरावे, त्यामुळे पक्षी पाणी पिण्याच्या निमित्त्याने आकर्षित होतात.
५) पक्षांकरीता पाण्याची व घरट्यांची सोय करावी जेणेकरुन पक्षी कायमचे शेतात थांबतात.

Exit mobile version