तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी अशा पद्धतीने करा नियोजन

खरीप हंगामामध्ये तुर हे अतिशय महत्वाचे पीक आहे. या पिकाला २१ ते २५ सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरीता योग्य असते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनित सुध्दा तूर चांगली येते. जमिनित स्फुरद, कॅल्शियम, गंधक या द्रवाच्या करतरता नसावी. साधारणतः ६.५ ते ७.५ सामु असलेली जमीन या पिकास योग्य असते.

पूर्वमशागत :

रब्बी हंगामाचे पीक निघाल्यांनतर चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी, व कोष इ. नष्ट होतात. जमीन तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते. अन्नद्रव्ये मुक्त होतात. आणि जमिनीचा पोत सुधारतो. मान्सुनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच कुळव्याची पाळी देऊन काडी कचरा स्वच्छ वेचून जमीन पेरणीसाठी ठेवावी.

योग्य वांणाची निवड

तुरीमध्ये विपुला, फुले राजेश्वरी, आय.सी.पी.एल- ८७, ए.के.टी. – ८८११, बी.एस.एम.आर. बी.एस. एम. आर. ७३६, बी. डी.एन. ७११ तसेच बी. डी. एन. ७१६ असे चांगले वाण आहेत.

पेरणीची वेळ

तुरीची पेरणी होणे आवश्यक आहे. पाहिल्या नंतर शेत चांगले तयार करावे. काही कचरा स्वच्छ करावे. जुनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उसीरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. या साठी १० जुलैपूर्वी पेरणी करावी.

आतंरपिके

तूर हे बहुतांशी आतंरपिक म्हणुन ओळखले जाते. तूर + बाजरी (१:२), तूर + सुर्यफुल (१:२), तूर +सोयाबीन (१:३), अशा प्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येते. तूरीचे सलग पीक सुध्दा चांगले उत्पादन देते.

पेरणीचे अंतर

सलग पिक घ्यावयाचे असल्यास आय. सी. पी. एल. ८७ या अती लवकर तयरी होणाऱ्या वाणाकरीता ४५ x१० सें.मी. अंतर ठेवावे. ए. के. टी.- ८८११ करिता ४५ X २० से.मी. अंतर ठेवावे. लवकर कालावधीच्या वाणाकरीता ६० X २० सें.मी. अंतर ठेवावे. तर विपुला या मध्यम कालावधीच्या वाणाकरीता १० X २० सें.मी. अंतर वापरावे, अलिकडे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्ये अधिक अंतरावर पेरलेल्या तूर पिकाचे आशादायक उत्पादन मिळाले आहे. म्हणुन १८० ( ३० सें.मी. किंवा ९० X ६० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. १८० X ३० सें.मी. अंतरावर करून त्यात सोयाबिनच्या ३ ओळी अंतरपिक म्हणुन ४५ X ५ सें.मी. अंतरावर लागवड करता येऊ शकते. सोयाबीन पीक लवकर निघुन जाते. तसेच तुर व सोयाबीन दोन्ही पिकातुन अधिक उत्पादन मिळू शकते.

बियाणे प्रमाण :

आय. सी. पी. एल.- ८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या राजेश्वरी, विपुला, ए. के. टी.- ८८११ या वाणासाठी हेक्टरी १२-१५ किलो बियाणे पुरते. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावावयाच्या हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे पुरेशे होते. बीजप्रक्रिया प्रेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी. यांनंतर २५० ग्रॅम रायझोबियम १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.

खत व्यवस्थापन :

सलग तुरीसाठी हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो डीएपी पेरणीचे वेळी यावे. आंतरपिक असल्यास ज्या पिकांचा ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खत मात्रा द्यावी. उदा. सोयाविन करीता ५० किलो आणि ७५ किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी.

आंतर मशागत :

पिकात १५ ते २० दिवसांनंतर कोळपणी करावी. पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३०-४५ दिवस शेत तणविरहित ठेवावे. तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणी करतांना वापशावर (पुरेसा ओलावा) पेंडीमेथीलीन (स्टॉप प्लस) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टर ला ५०० लिटर पाण्यात फवारावे. पाणी व्यवस्थापन तुर हे खरीप हंगामातील पिक असल्यामुळे ते पावसावर वाढते. त थापि पावसामध्ये थंड पडल्यास किंवा पाण्याचा पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीस अवस्थेमध्ये (३० ते ३५ दिवस) फुलोऱ्याच्या अवस्थेत (६० ते ७०) दिवस आणि शेंगा भरवयाच्या अवस्थत पाणी द्यावे. त्यामुळे पिक उत्पादनात अधिक वाढ होते.

पीक संरक्षण

तुरी मध्ये फुलोरा व शेंगा भरवण्याच्या अवस्थेत घाटेअळी, पिसारी पतंग, शेंग माशी या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीने नियंत्रण करावे. तृणधान्याचे आतंरपीक असल्यास किडीचे प्रमाण कमी राहते. एच.ए.एन. पी. व्ही. या जैविक किड नियंत्रणाचा वापर करावा. फुलकळी लागतांना पाहिली फवारणी १२-१५ दिवसांनी हेलीओकिल ५०० मिली/हेक्टर आणि गरजेनुसार दुसरी फवारणी एच. ए.एन.पी.व्ही. १५० मिली अथवा इमामेक्टीन बेंझएट ५% एस.जी. २०० ग्रॅम अथवा स्पिनोसॅड ४५ ज्ञ एस. सी. प्रवाही २०० मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातुन फवारणे.

साठवण:

साठवणी पुर्वी तुर धान्य ५-६ दिवस उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओल्या जागेत करु नये. शक्य असल्यास कडुलिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळुन धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणितील किडीपासुन सुरक्षित राहते.

उत्पादन:

अशा प्रकारे सुधारीत वाण आणि तंत्रज्ञानाचा वापर करुण तुरीची लागवड केल्यास सरासरी १८ ते २० क्विंटल प्रति उत्पादन मिळु शकते.

(साभार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-21, माहिती पुस्तिका – लागवड व तंत्रज्ञान)

Exit mobile version