कोरडवाहू रब्बी पिकांचे व्यवस्थापन कसे करावे?

farmer 1

मुंबई : खरिप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकं हातातून निघून घेली आहे. यामुळे बहुतांश शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. आज आपण कोरडवाहू रब्बी पिकांचे व्यवस्थापन कसे करावे? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जमीन व पिके
मध्यम जमीन : सूर्यफूल, करडई
मध्यम खोल जमीन : रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, रब्बी ज्वारी + करडई, करडई + हरभरा.
खोल जमीन : रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके करडई, हरभरा या दुबार पीक पद्धती घ्याव्यात.

रब्बी ज्वारी
४ अथवा ६ ओळींनंतर सरी काढणे, रुंद वरंबा-सरी पद्धतीचा अवलंब करणे हे जमीन आणि पाणी संवर्धनासाठी महत्त्चाचे आहे. या तंत्राने पावसाचे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात साठविलें जाते. त्यामुळे रब्बी पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. पेरणीपूर्व एक महिना मध्यम ते भारी, ४५ सेंमी. खोल जमिनीवर ४५ सेंमी. ठेवून सन्या काढन्यात. योग्य ओलावा असताना तिफणीच्या सहाय्याने पेरणी करावी.
सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासणी करू नये. यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पावसाचे पाणी जमीनीत मुरून पिकाला ओलाचा उपलब्ध होतो. सोयाबीन या पिकांमधील तणांचा बंदोबस्त योग्य वेळी केल्यास जमिनीमध्ये दीर्घ काळ ओलाचा टिकून रब्बी हंगामातील दुबार पिकाचे उत्पादन अधिक मिळते. रब्बीसाठी मृदा संधारण, सुधारित जातींची निवड, वेळेवर मशागत व पेरणी, तणांचा ओलावा, आपत्कालीन पीक योजनांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
हेक्टरी १० किलो बियाणे पेरावे व खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेवर पेरणी करून बियाण्थाला ३५ टक्के थायोमिथोक्झॅम ५ ग्रॅम प्रतिकिलो चोळून बीजप्रक्रिया करावी.

हराभरा
कोरडवाहू परिस्थितीमध्ये हरभप्याची पेरणी सप्टेंबरचा तिसरा आठवडा ते १५ ऑक्टोबर पर्यंत करावी. हेक्टरी ६० ते ६५ किलो बियाणे वापरावे. हरभर्‍यामध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्व प्रतिकेलिी ३ ग्रॅम किंवा २ ग्रॅम काबॅडझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. त्यानंतर रायझोबियम व पीएसबी हे जिवाणुसंवर्धक बियाण्यास चोळावे.
हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद पेरताना खोल पेरून द्यावे. पीक तीन आठवड्यांचे झाल्यावर १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ कोळपण्या कराव्यात. हरभरापिकास २ टक्के डीएपी (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा २ टक्के युरिया द्रावणाची पहिली फवारणी फुले येण्यापूर्वी आणि त्यानंतर १० ते १२ दिवसांनी दुसरी फवारणी केल्यास दाणे चांगले भरुन उत्पादनात वाढ होते.
हरभर्‍याला घाटे भरण्याच्या अवस्थेत १ टका १३.०.४५ (पोटॅशियम नायट्रेट)ची फवारणी करावी. घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात २८ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी फुलोरा अवस्था व दुसरे पाणी घाटे भरण्याच्या अवस्थेत दिल्यास उत्पादनात ५२ टक्के वाढ होते. घाटेअळीचा बंदोबस्त अळी लहान असतानाच एकात्मिक कोड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

करडई
करडईची ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात पेरणी करावी. यासाठी हेक्टरी १० ते १२ किलो प्रक्रिया केलेलं बियाणे वापरावे. पेरणी १८ बाय २० सेंमी. अंतरावर करावी. करडईमध्ये मर रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्व प्रतिकिलो बियाण्याला ३ ग्रॅम किंवा २ ग्रॅम काबँडझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. त्यानंतर अ‍ॅसेटोबॅक्टर व पीएसबी जीवाणूवर्धक बियाण्याला चोळावे. हेक्टरी ४० क्विंटल नत्र आणि २० किलो स्फुरद बियाणे पेरताना खोल पेरुन द्यावे.
रब्बी ज्वारी व करडई : ही आंतरपीक पद्धती, ज्या क्षेत्रात रब्बी जचारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्थात आली आहे. वातावरणातील उष्ण तापमानातील तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई सलग पिकातील येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते ही आंतरपीक पद्धत ज्वारी : करडई (६:३) या ओळींच्या प्रमाणात शिफारस केलेली आहे.

करडई व हरभरा : मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. ४:२ अथवा ६:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.
जवस व हरभरा : मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ६:३ अथवा ३:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धत घेतल्यास जास्त फायदा होतो. याप्रकारे वरील दर्शविलेल्या सर्व तंत्रांचा शेतकर्‍यांनी अवलंब केल्यास कोरड़वाहू रब्बी पीक उत्पादनात वाढ होईल.
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Exit mobile version