बैलाच्या खांद्यावरील ओझे कमी करण्यासाठी बैलगाडीला तिसरे चाक; इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचा जुगाड

IIT students juggle bullock cart third wheel

सांगली : शेतीकामांसाठी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आजही बैलगाडीचा वापर केला जातो. पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस वाहतूकीसाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादले जात असल्याने बैलांचे प्रचंड हाल होतात. हे कष्ट कमी करण्यासाठी बैलगाडीला तिसरे चाक जोडण्याचा जुगाड इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढला आहे. या अत्याधुनिक बैलगाडीचे वेगळेपण कायम राहण्यासाठी पेटंट देखील घेतले जाणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊस गाळप हंगामात बैलांच्या खांद्यावर टनाहून अधिकच्या ऊसाचा भार असतो. बैलांचे हे कष्ट पाहून आयआयटी मधील विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक पध्दतीने बैलगाडी बनवली आहे. त्यामुळे बैलांवर अधिकचे ओझे तर पडणार नाही पण वाहतूक अगदी सहजरित्या होणार आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने ही अनोखी भेट शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. या बैलगाडीला रोलिंगचा सपोर्ट देण्यात आला असून याला सारथी असे नाव दिले आहे.

सारथीमध्ये बैलगाडीला रोलिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये बैलाच्या खांद्यावरील झू च्या मधोमध हा रोलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे समसान प्रमाणात भार हा रोलिंगवर पडणार आहे. या सपोर्टचा वापर अधिकतर रित्या ऊस वाहतूकीसाठीच होणार आहे. या सपोर्टमुळे बैलांच्या खांद्यावरील भार तर कमी होतोच, पण बैलगाडीचे संतुलन होते. या बैलगाडीची प्राथमिक चाचणी झाली आहे.

Exit mobile version