कृषी यांत्रिकीकरणामुळे शेती व शेतकर्‍यांवर काय परिणाम होतोय, तुम्हाला माहित आहे का?

agriculture modernization

नागपूर : भारत केवळ आयटी क्षेत्रातच नव्हे तर कृषी क्षेत्रातही प्रगती करत आहे. यात यांत्रिकीकरणाचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्रात यंत्रांचा वापर केला तर त्याचा परिणाम उत्पादकतेवर स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजेच, उत्पादनातही वाढ होते आणि मजुरीच्या खर्चात घट दिसून येते. अशा परिस्थितीत सर्वोत्तम कृषी यांत्रिकीकरण मिळविण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

आउटडोअर हॅन्डहेल्ड पॉवर टूल्स जसे की, चेन सॉ, ब्रश कटर, हेज ट्रिमर, ब्लोअर, बॅकपॅक ब्लोअर, व्हॅक्यूम श्रेडर यासारख्या प्रगत उपकरणांचा समावेश आहे. टेलिस्कोपिक प्रूनर्स, अर्थ ऑगर्स, रेस्क्यू सॉ आणि कट ऑफ सॉ आदी प्रकारची उत्पादने शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहेत. शेतीला अधिक सोयीस्कर बनवण्याच्या उद्देशाने, अजूनही शेतकर्‍यांना कृषी अवजारांचा योग्य वापर आणि फायदे समजून घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. जेणेकरून येणार्‍या काळात भारतातील शेतकरी मागे राहू नयेत.

अनेक महागडी कृषी अवजारे अल्पभूधारक शेतकर्‍यांना परवडत नसल्याने आता त्यांच्यासमोर कृषी अवजारे बँकेचा पर्याय उभा राहिला आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात अवाजारे बँका सुरु झाल्या आहेत. ज्या माध्यमातून शेतकर्‍यांना अत्यल्प दरात यांत्रिकरण सुविधेचा लाभ घेता येत आहे. यांत्रिकरणामुळे कृषी उत्पादनात वाढ होत असून येणार्‍या काळात याचे प्रमाण वाढेल, असा तज्ञांचा अंदाज आहे.

Exit mobile version