सोयाबीन बियाण्यांबाबत कृषी विभागाचा ‘हा’ आहे महत्वाचा सल्ला

soyabean

औरंगाबात : सोयाबीन बियाण्यांच्या वाढत्या मागणीमुळे शेतकर्‍यांनी घरच्या बियाणावर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काळाच्या ओघात बियाणांचे वाढते दर अन् बेभरवश्याचे उत्पादन यामुळे शेतकर्‍यांना घरचे बियाणेच फायदेशीर ठरते. यासाठी उगवण क्षमता काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. यासाठी घरी बियाणे तयार करतांना कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी विभागाने शेतकर्‍यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

शेतकर्‍यांनी सर्वप्रथम बंद पोत्यातील मूठभर धान्य बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्व पोत्यांमधील काढलेले धान्य हे एकत्र करुन घ्यावे लागणार आहे. त्यानंतर काढलेले सोयाबीन हे स्वच्छ धुऊन घ्यावे लागते. गोणपाटाचा एक तुकडा हा जमिनीवर पसरणे गरजेचे आहे. पोत्यातून बाजूला काढलेल्या धान्यातून १०० दाणे मोजावे आणि दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर ओळीत ठेऊन त्याचे तीन नमुने तयार करावे लागणार आहे. त्यानंतर गोणपटावर चांगले पाणी मारल्यामुळे ते ओले करावे लागणार आहे.

गोणपटावर पाणी शिंपडून ते ओले तर करावेच लागते. यानंतर बियाणांवर दुसर्‍या गोणपटाचा वापर करवा लागणार आहे. गोणपटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गुंडाळी करुन ते गोणपाट थंड हवेच्या ठिकाणी आणले जाते. सलग सात दिवसानंतर गोणपाटाची गुंडाळी करुन ठेवावे लागणार आहे.

घरचे बियाणे तयार करण्याची एक प्रक्रिया असली तरी केलेला प्रयोग यशस्वी आहे का तो तपासणेही गरजेचे आहे. म्हणूनच गोणपाटाचा आधार घेऊन हे बियाणे साठवले जाते. गोणपटामध्ये गुंडाळलेल्या १०० बियाणांपैकी ७० बियाणांची उगवण झाली तरी बियाणे पेरणी योग्य आहे असे समजावे.

Exit mobile version