निर्यातक्षम फळांसाठी महत्त्वाच्या बाबी

Fruit crop insurance plan

पुणे : भारतातील शेतकरी त्यांच्या शेतात नवनवे प्रयोग करुन विक्रमी उत्पादन घेण्यात अग्रेसर असतात. फळांचे उत्पादन घेतांना शेतकर्‍यांनी काही बाबींकडे लक्ष दिल्यास त्या फळांना परदेशातही मोठी बाजारपेठ उपलब्ध होवू शकते. मुळात फळांची निर्यात करण्यासाठी त्या फळाच्या गुणवत्तेकडे अगदी लागवडीपासून थेट काढणीपर्यंत लक्ष द्यावे लागते. निर्याणक्षम फळांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काही बाबी खूप महत्त्वाच्या असतात. त्या खालील प्रमाणे…

१) फळे रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी.
२) खराब किंवा डाग पडलेली, पिवळी फळे निवडून वेगळी करावीत.
३) फळांची प्रतवारी करूनच निर्यातीसाठी पाठवावीत.
४) फळांच्या पॅकिंगसाठी ज्यूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या पिशव्यांचा वापर करावा.
५) ज्या त्या देशाच्या मानकाप्रमाणे फळांचा दर्जा असेल तशाच फळांची तोडणी करून, प्रतवारी करावी आणि पॅकिंग साहित्य वापरावे.

६) टिश्यू पेपरचा वापर फळे गुंडाळण्यासाठी करावा जेणे करून बाष्पीभवन कमी करून टिकाऊ कालावधी वाढविण्यासाठी उपयोग होतो.
७) फळे तोडणीच्या वेळी शक्यतो थंड वातावरण असावे. तसेच तापमान ७ ते १० अंश सें.ग्रे. आणि आर्द्रता ९० ते ९५ टक्के असावी.
८) पॅकिंगसाठी टिश्यू पेपरचा वापर करावा त्यानंतर कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्स वापरावेत.
९) निर्यातीवेळी फळे पाठविण्यासाठी फळांवर कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम.आर. लेव्हल पेक्षा जास्त नसावेत.
१०) ज्या बुरशीनाशकावर किंवा कीटकनाशकावर भाजीपाला पिकामध्ये वापरण्यास बंदी घातली आहे अशी औषधे फवारणीसाठी वापरू नयेत.

Exit mobile version