शेतांमध्ये ट्रॅक्टर ऐवजी दिसतायेत बैलजोड्या; हे आहे मुख्य कारण

Success farmer

जळगाव : मे महिना उजाडल्यामुळे शेतांमध्ये खरीप हंगामपुर्व मशागतीचे कामे सुरु झाली आहेत. नांगरणी, जमीन लेव्हलींग, रोटा आदी कामांना शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे. मात्र शेतांमध्ये ट्रॅक्टर ऐवजी बैलजोड्याच जास्त दिसत आहेत. अचानक हे चित्र का बदलले? असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे.

रब्बी हंगाम संपताच खरिपात उत्पादन वाढावे म्हणून शेती मशागतीची कामे केली जातात. वेळेची बचत व कडक उन्हाळ्यापासून बचावासाठी बहुतांश कामे ट्रॅक्टरव्दारेच केली जातात. मात्र गत काही महिन्यांपासून डीझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्याने आता शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणे बैलजोडीचा सहारा घ्यावा लागत आहे.

इंधनाचे दर वाढ झाल्याने ट्रॅक्टरव्दारे होणार्‍या मशागत कामाचेही दरवाढ झाली आहे. सध्या शेतजमिनीची नांगरणी करण्यासाठी एकरी २ हजार रुपये तर रोटरण्यासाठीही २ हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी १ हजार रुपये, पेरणी १ हजार ५०० रुपये तर पालकुट्टीसाठी २ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा बैलजोड्यांकडे वळले आहेत.

Exit mobile version