दिवसभर शेतीचे काम आणि रात्री पंपाचे संरक्षण; वाचा का आली अशी वेळ

agricultural pumps

पुणे : यंदाच्या हंमागात शेतकर्‍यांच्या मागे लागलेले दृष्टचक्र सुटायचेच नाव घेत नाहीए. गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अद्यापही अनेक विहिरींना पाणी आहे. त्यामुळे निसर्गाशी दोन हात करत शेतकरी नवनवे प्रयोग करत आहे. यासाठी दिवसभर शेतात राबावे लागल आहे. मात्र आता तर रात्रीही शेतकर्‍यांना शेतातच पहारा द्यावा लागत आहे. शिरुर तालुक्यात कृषिपंप चोरीला जाण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. यामुळे चोरट्यांच्या धाकामुळे शेतकरी रात्रीही शेतातच राहत आहेत.

शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावातील तब्बल १० कृषिपंप हे चोरीला गेले आहेत. एकाच रात्रीचत १० कृषिपंपाची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकर्‍यांचाही झोप उडाली आहे. चोरट्यांनी थेट कृषीपंपावरच डल्ला मारण्याचा धडाका सुरु केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कृषीपंपाची चोरी होऊ नये म्हणून शेतकरी शेतामध्ये रात्र जागून काढू लागले आहेत. दिवसभर शेतीचे काम आणि रात्री पंपाचे संरक्षण. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करुन शेतकर्‍यांच्या मनातील भीती दूर करण्याची मागणी आहे. पाण्याअभावी उन्हाळी पिकांचे मात्र नुकसान सुरु आहे.

Exit mobile version