शेतकर्‍यांना मोदी सरकारकडून दिवाळी भेट, एमएसपीत मोठी वाढ, असा होईल फायदा

msp

नवी दिल्ली : मोदी सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना मोठी भेट दिली आहे. २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

येत्या रब्बी हंगामासाठी सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये ११० रुपये प्रति क्विंटल २०१५ वरून २१२५ रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. चण्याच्या एमएसपीमध्येही ११० रुपयांची वाढ करण्यात आली असून ती ५२३० रुपयांवरून ५३३५ रुपये प्रति क्विंटल झाली आहे. सरकारने मसूरच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मसूरची एमएसपी ५५०० रुपयांवरून ६००० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. रेपसीड (पांढरी मोहरी) आणि पिवळी मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल ४०० रुपयांनी वाढवून ५०५० रुपयांवरून ५४५० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. सैफ फ्लॉवरच्या एमएसपीमध्ये २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सैफ फ्लॉवरची एमएसपी ५४४१ रुपयांवरून ५६५० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. बार्लीच्या एमएसपीमध्ये १०० रुपयांची वाढ करण्यात आली असून ती १६३५ रुपयांवरून १७३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.

Exit mobile version