कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांची निर्यात पोहचली ४१.२५ अब्जांवर

agriculture-export

कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांची निर्यात

शेत शिवार । नवी दिल्ली : देशाच्या कृषी निर्यात क्षेत्राने वर्ष २०२०-२१ मध्ये उत्तम कामगिरी केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य सचिव, डॉ अनुप वाधवान यांनी दिली. गेली. तीन वर्षे, स्थिर असलेल्या कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांच्या निर्यातीत (वर्ष २०१७-१८ मध्ये ३८.४३ अब्ज डॉलर्स, वर्ष २०१८-१९ मध्ये ३८.७४ अब्ज डॉलर्स आणि वर्ष २०१९-२० मध्ये ३५.१६ अब्ज डॉलर्स) वर्ष २०२०-२१ मध्ये ४१.२५ अब्ज डॉलर्सपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे.

यात सागरी आणि वनस्पतीजन्य उत्पादनांचा समावेश असून, टक्केवारीनुसार, यंदा निर्यातीत १७.३४ टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय चलनाच्या हिशेबात सांगायचे झाल्यास, २०२०-२१ मध्ये ही वाढ २२.६२% एवढी म्हणजेच, ३.०५ लाख कोटी रुपये आहे, वर्ष २०१९-२० मध्ये ही वाढ २.४९ लाख कोटी इतकी होती. वर्ष २०१९-२० मध्ये भारताची कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांची आयात २०.६४ अब्ज डाॅलर्स इतकी, तर २०२०-२१ मध्ये २०.६७ अब्ज डॉलर्स इतकी होती.

कोविडच्या काळातही कृषी व्यापारातील समतोल ४२.१६% नी सुधारला असून आधी १४.५१ अब्ज डॉलर्स असलेला व्यापार २०.५८ अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे. कृषी उत्पादनांनी (सागरी आणि वनस्पतीजन्य उत्पादने वगळून) वर्ष २०२०-२१ मध्ये २९.८१ अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून ती २८.३६% इतकी आहे. वर्ष २०१९-२० मध्ये ही निर्यात २३.२३ अब्ज डॉलर्स इतकी होती. कोविड काळात मुख्य अन्नधान्यांची मागणी वाढल्याचा लाभ भारताच्या निर्यातिला मिळाला.

या काळात कडधान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली, त्यासोबतच, बासमती तांदळाच्या निर्यातीत १३६.०४ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ४७९४.५४ दशलक्ष डॉलर्सची वाढ, गव्हाच्या निर्यातीत ७७४.१७% पर्यंत म्हणजेच ५४९.१६ दशलक्ष डॉलर्सची वाढ, आणि इतर तृणधान्य यांच्या निर्यातीत ( बाजरी, मका आणि इतर भरड धान्ये) २३८.२८% पर्यंत म्हणजेच ६९४.१४ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली.

इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीतही वर्ष २०१९-२० च्या तुलनेत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. यात, मुख्यतः तेलबियांची ढेप (१५७५.३४ दशलक्ष डॉलर्स -९०.२८% ची वाढ),साखर(२७८९.९७ दशलक्ष डॉलर्स -४१.८८% ची वाढ ), कच्चा कापूस (१८९७.२० दशलक्ष डॉलर्स – ७९.४३%ची वाढ) ताजा भाजीपाला (७२१.४७ दशलक्ष डॉलर्स – १०.७१%ची वाढ) आणि वनस्पती तेल (६०२.७७ दशलक्ष डॉलर्स – ६०२.७७ ची वाढ) इत्यादींचा समावेश आहे.

भारताच्या कृषी उत्पादनांचे सर्वात मोठे आयातदार देश अमेरिका, चीन, बांग्लादेश,आखाती देश, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, नेपाल, ईराण आणि मलेशिया हे आहेत. या सर्व देशांपिंकी बहुतांशी देशात केल्या जाणार्‍या निर्यातीत वाढ झाल्याचे आढळले आहे. सर्वाधिक निर्यातवाढ इंडोनेशियात (१०२.४२%),त्याखालोखाल बांगलादेश (९५.९३%) आणि नेपाळ (५०.४९%) मध्ये झाली आहे.

आले, मिरे, वेलची, दालचिनी, हळद, केशर अशा सर्व मसाल्याच्या पदार्थांची, जे त्यांच्या वैद्यकीय औषधी गुणांसाठीही ओळखले जातात- त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये मिर्‍यांची निर्यात २८.७२% नी वाढून १२६९.३८ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोचली,दालचिनीची (कलमी)निर्यात ६४.४७ % नी वाढून ११.२५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत, जायफळ, जायपत्री आणि वेलचीची निर्यात १३२.०३%(१८९.३४ दशलक्ष डॉलर्स – ८१.६० दशलक्ष डॉलर्स) आणि आले, केशर, हळद,ओवा, तमालपत्र अशा वस्तूंची निर्यात ३५.४४% नी म्हणजेच ५७०.६३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली. वर्ष २०२०-२१ मध्ये मसाल्याच्या पदार्थांच्या निर्यातीत आजवरची सर्वाधिक म्हणजेच चार अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Exit mobile version