मिरचीमुळे भारताला मिळाले ६ हजार कोटी; वाचा काय आहे स्टोरी…

red-chilli

मुंबई : मिरचीच्या उत्पन्नातून भरघोस आर्थिक लाभ पदरात पाडून घेणार्‍या अनेक शेतकर्‍यांच्या स्टोरीज आपण आजपर्यंत वाचलेल्या आहेत. मात्र मिरचीमुळे देशाला तब्बल ६ हजार कोटी रुपये मिळाले, असे कुणी सांगितल्यास त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. मात्र मसाल्यांच्या निर्यातीमधून वर्षाकाठी २१ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल यामधून होत आहे. तर मिरची निर्यातीमधून ६ हजार ५०० कोटींची उलाढाल होत आहे. गेल्या वर्षी भारतातून एकूण मसाल्याची निर्यात २७ हजार १९३ कोटी रुपयांच्या पुढे गेली.

महाराष्ट्रात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात घेतले जाते. देशात मिरची उत्पादनात आंध्र प्रदेश हे अव्वलस्थानी आहे. येथील मिरचीची चव, तिखटपणा आणि मसाल्यासाठी अधिकचा वापर यामुळे जगभरात भारतीय मिरचीला अधिकची पसंती आहे.

बेडगी मिरचीला अधिकची मागणी

कर्नाटकमध्ये पिकणार्‍या ‘बेडगी’ मिरचीचा रंग आणि तिखटपणामुळे जागतिक बाजारात मोठी मागणी आहे. पुसा ज्वाला, सोना-२१, जवाहर, सदाहरित, अग्नी, गुंटूर – प्रकासम – कृष्णा प्रदेशात उगवलेल्या ‘तेजा’ आणि ‘गुंटूर संनम’ या जातींमुळे आंध्र प्रदेश भारतात मिरची उत्पादनात अग्रेसर आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही मिरची उत्पादक इतर प्रमुख राज्ये आहेत.

Exit mobile version