बियांणाचा काळाबाजार करणे पडणार महागात 

Seeds

अकोला : कृषी विभागाची खतांवर करडी नजर असून, दलालांना आता, बियाणांचा काळाबाजार करणे महागात पडणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. तहसील कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत व्यावसायिकांना चढ्या भावाने विक्री करू नये, असे आदेश कृषी व्यावसायिक संघाच्या कार्यशाळेत दिले.

तहसील कार्यालयामध्ये बनावट बीटी बियाणे व एचबीटी बियाणे विक्री करू नये, सोयाबीन बियाणे विक्री करताना त्यांची उगवण क्षमता तपासण्यात यावी, बियाणे व खते चढ्या भावाने विकू नयेत, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे, अशा सूचना कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या. खते रास्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी योजना करा, कृषी सेवा केंद्र चालकाने त्यांची सर्व कागदपत्रे पूर्णपणे तयार ठेवली, आदी विषयांवर अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित कृषी व्यावसायिकांना माहिती दिली.

कार्यशाळेत कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे, तहसील कृषी अधिकारी शशिकिरण जांब्रुणकर, अभियान अधिकारी मिलिंद जंजाळ, गुणनियंत्रक निरीक्षक नितीन लोखंडे, पंचायत समिती कृषी अधिकारी रोहिणी मोघाड आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्ताविक व संचालन तहसील कृषी अधिकारी शशिकिरण जांब्रुणकर यांनी केले तर आभार गणेश पारळकर यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी मनीषा जोशी, मीना चव्हाण, कृषी अधिकारी गजानन महाल्ले, विभागीय कृषी अधिकारी प्रदीप राऊत, विभागीय कृषी अधिकारी व्ही.एच.राखुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version