रांजणगावात ज्वारी काढणीला वेग, पण ‘यामुळे’ शेतकरी चिंतित

jawar

पुणे : शिरूर (Shirur) तालुक्यातील रांजणगाव (Ranjangaon) परिसरात ज्वारी (Jawar) काढणीला वेग आला असून वातावरणाच्या बदलामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटणार आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी ग्रामीण भागात हुरडा पार्टीचे प्रमाण कमी झाले आहे.

तालुक्यात या वर्षी साधारण १४ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ४४ टक्के ज्वारीची पेरणी झाली होती. जिरायती पट्ट्यातील रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला वेग आला आहे. ज्वारी पिकाची काढणी तशी अवघड मानली जाते. शेताला चांगले खतपाणी असले तर काढणीला त्रास होत नाही. रान कडक झाले असल्यास ज्वारीचे ताट उपटले जात नाही. त्यामुळे बोटे कापणे, फोड येणे, शिरळ भरणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सध्या ज्वारी काढणीला मजूर मिळत नाही.

ज्वारी या पिकाची काढणी ही तशी अवघड मानली जाते. शेताला खतपाणी चांगले असले तर ज्वारीचे तांटे उपटायला त्रास होत नाही, अन्यथा रान कडक झाले असल्यास ताटे उपटत नाही. बोटे कापने, फोड येणे, शिरळक भरणे असे प्रकार घडतात. यामुळे सद्य स्थितीत ज्वारी काढायला मजूर मिळत नाही. अलिकडे इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीचे पीक घेणे मोठे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे ज्वारी काढताना मजूर न मिळाल्यामुळे मित्र मंडळी नातेवाईक जमवून ज्वारी काढण्याचे काटण्याचे नियोजन केले जाते. बहुतांशी ठिकाणी सावड करून उसनवारी करून ज्वारी काढली जाते. त्याला ग्रामीण भागात इंरजीक म्हणतात. भलरीच्या (पांरपरिक गीतावर) सुरावर ढोल ताशाच्या तालावर ज्वारी उपटली जाते.

ढगाळ वातावरणाचा फटका
सांगली, सोलापूर भागातील मालदांडी या जातीच्या ज्वारी बियाणांची पेरणी या परिसरात शेतकरी करतात. जिरायत भागात अवकाळी पाऊसाच्या हजेरीने यंदा ज्वारी पीक जोमात येईल. असे वाटले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात ढगाळ वातावरण, धुके व सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे ज्वारी कणसात येऊन दाणा भरला नाही. काही ठिकाणी या वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर झालेला पहावयास मिळतो. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे असले तरी ज्वारीच्या ताट जोमात आले असून कडबा चांगल्या प्रकारे निघणार आहे. त्यामुळे कडब्याला ही चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version