शेतकर्‍याने बाजारात विक्रीसाठी आणला ४० पोती कांदा; पैसे तर मिळालेच नाही पण खिशातून द्यावे लागले ७ रुपये

kanda-bajarbhav

सोलापूर : सध्या कांदा शेतकर्‍यांना चांगलाच रडावत आहे. कांद्याला प्रतिकिलो २ ते ४ रुपये दर मिळत असल्याने उत्पादन खर्च ही निघत नसल्याने शेतकरी रडकुंडीला आहे. कांद्याची विक्री होत नसल्याने किंवा परवडत नसल्याने शेतकर्‍याने कांदा मोफत वाटला, फेकून दिला अशा बातम्या वाचायला मिळत आहे. मात्र त्याहून कृर थट्टा म्हणजे एका शेतकर्‍याने बाजारात विक्रीसाठी ४० पोती कांदा आणला. त्यातून शेतकर्‍याला पैसे तर मिळालेच नाही पण खिशातून द्यावे ७ रुपये द्यावे लागले.

अंजनगाव खेलोबा (ता.माढा) येथील युवा शेतकरी ओंकार पाटेकर याने दोन एकर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी आतापर्यंत जवळपास लाखभर रुपये केला होता. कांदा काढणीला आला असताना, अचानक कांद्याचे भाव कोसळले. तरीदेखील या युवा शेतकर्‍यांने खर्च तरी निघेल या अपेक्षेने सोलापूर आडतीवर ८५ पोती कांदा विभागुन नेला होता.

त्यापैकी ४५ पोती असलेल्या कांद्याचा गाडी खर्च निघाला परंतु, ४० पोती असलेल्या कांदा प्रतिकिलो १ रूपये दराने विकला गेल्याने त्याचे १८८३ रूपये झाले, पण गाडी खर्च, हमाल खर्च, तोलाई खर्च १९५४ इतका झाल्याने, आडतवाल्यालाच ७ रूपये देण्याची वेळ या शेतकर्‍यावर आली आहे. त्यामुळे या युवा शेतकर्‍याचे कांद्याने चांगलेच वांदे केले आहे.

Exit mobile version