शेती विकत घेण्यासाठी 50 टक्के अनुदान; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

indian currency

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 नुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीची खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिल्या जाते.

महाराष्ट्र राज्यात राहणार्‍या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पभूधारक शेतकरी २०२२ योजनेंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावे केली जाते. मात्र विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात राज्य सरकार कडून देण्यात येते.

भूमीहीन योजना 2022  साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. यासाठी शेतकऱयांनी संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी.

भूमिहीन योजना 2022 च्या अटी

आवश्यक कागदपत्रे

साभार – महाराष्ट्र शासन कृषी विभाग.

Exit mobile version