हळदीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल; अशी आहे स्थिति, जाणून घ्या सविस्तर

karpa-disease-on-turmeric

हिंगोली : हळद व आले या पिकांच्या शाकीय वाढीत निर्माण होणारी पानांची व फुटव्यांची संख्या यांचा उत्पादनवाढीमध्ये मोठा वाटा असतो. मात्र यंदा लांबलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले तसेच वातावरणात अधिक काळ आर्द्रता राहिली. परिणामी या पिकात कंदकूज व करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करीत आहे. काही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक घेण्याचा नवा प्रयोग यशस्वी केला; मात्र अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यात आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठात जास्त संख्येने हळदीची आवक होत असते. या बाजारातील शेतकऱ्यांना लगेचच पैसे हातात येतात. त्यामुळे परजिल्हा आणि परराज्यातूनही आवक सुरु असते. यंदा मात्र, करपा आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा अंदाज आहे.

मात्र सध्या ९ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांना अधिकच्या दराची अपेक्षा आहे. अजून १५ हजार रुपये दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हिंगोलीतील या बाजारास एक वेगळेच महत्व आहे.परदेशातून देखील या बाजारपेठेत आवक होते. सततच्या बदलत्या वातावरणामुळे पिकांचे मोठ्या प्रणामावर नुकसान झाले आहे. अचानकपणे ढगाळ वातावरण झाल्यामुळे हळदी पिकावर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळून येत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. वसमतच्या बाजारपेठेत देखील आवक घटली असून पीक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. हळदी पिकास सध्या थोडे समाधानकारक दर मिळत आहेत. परंतु शेतकऱ्यांना अधिक दराची अपेक्षा आहे.

हळद पिकासाठीही पहिल्यापासून अत्यंत पोषक वातावरण असल्यामुळे हळद पीक जोमात बहरले होते. मात्र, अति पावसाचा हळद पिकालाही मोठ्या फटका बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले. वातावरणात अधिक काळ आर्द्रता असल्यामुळे हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे हळद उत्पादक शेतकरी सांगतात. हळदीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

करपा रोगाची लक्षणे.. 
हळदीच्या पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. कालांतराने हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पान करपून जाते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे ठिपके दिसून येतात. तसेच करपा रोगामुळे पाने वाळून जातात. 

Exit mobile version