कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; असा आहे कार्यक्रम

election

पुणे : गाव पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांना प्रचंड महत्व असते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पात्र असलेल्या २८१ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. यामुळे गावागावात लवकरच राजकीय धुराळा उडणार आहे.

स्थानिक पातळीवर बाजार समितीमध्ये वर्चस्व कुणाचे यावरुनही राजकीय भूमिका ठरते. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणूकांना महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. असे असले तरी २८१ बाजार समित्यांची निवडणूक ही १७ जानेवारी रोजी तर उर्वरित ६ बाजार समित्यांची निवडणूक ही १८ व १९ डिसेंबरला होणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये ज्याचे नावे सातबारा उतारा आहे अशा प्रत्येक शेतकर्‍याला सहभाग घेता येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Exit mobile version