लिंबाच्या किमतीची थेट सफरचंदाशी स्पर्धा; जाणून घ्या काय आहे बाजारातील गणित

lemon-and-apple-1

नागपूर : उन्हामुळे मागणी वाढल्याने आणि पुरवठा घटल्याने लिंबाचा भाव चांगलाच आंबट झाला आहे. लिंबाच्या किमतीमुळे सफरचंदाला स्पर्धा होत आहे. बाजारात त्याची किरकोळ किंमत 160 रुपये किलोवर पोहोचली आहे. बाजारात मध्यम आकाराची सफरचंद 120 ते 140 रुपये किलोने विकली जात आहे. महागाईमुळे लोक 10-20 रुपयांना दोन-चार लिंबू विकत घेऊन काम करत आहेत. लिंबाचे दर तूर्त तरी खाली येणार नसल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

उन्हाळय़ात रसवंतीगृहे, सरबतांसह खण्यातही लिंबू जास्त प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे लिंबांना मोठी मागणी असते. मात्र या वर्षी अवकाळी पावसामुळे लिंबू बागांना जास्त पालवी फुटली नाही, परिणामी उत्पादनात घट झाली. सध्या वाशी घाऊक बाजारात आंध्र प्रदेश येथून ६० टन आवक होत आहे. तेच मागील वर्षी ९० ते १०० टन आवक होत होती. त्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत आवक घटली आहे. त्यात बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे. प्रतिकिलोचे दर ९० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात लिंबू ५ रुपयांवर गेले आहे. दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

पाच वर्षांत लिंबूची सर्वाधिक दर वाढ

सध्या तापमानात वाढ झाल्याने नागरिकांचा शितपेयांकडे कल वाढला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला व गल्ली- मोहल्ल्यांमध्ये शितपेयांची अनेक दुकाने लागली आहेत. लिंबूचा वापर मोठ्या प्रमाणात रसवंती, लिंबु सिकंजी, सोडा, लिंबू सरबत आदींमध्ये होत आहे. मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व ३ एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्यामुळे येथे लिंबूची मागणी वाढेल. कॅरेटच्या किमती ५०० ते ६०० रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत लिंबूच्या सर्वाधिक दर वाढ प्रथमच पाहायला मिळत आहे. अपेक्षित भाव मिळत असल्याने लिंबू उत्पादकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version