लिंबाचे दर विक्रमी पातळीवर तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच; जाणून घ्या काय आहे कारण

Lemon

पुणे : देशातील प्रमुख बाजारेपठांमध्ये लिंबाचा भाव २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. म्हणजे जवळपास आठ रुपयांना एक लिंबू विकले जात आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी मालामाल झाले असतील असे कोणालाही वाटू शकते. पण तसे अजिबात नाही. लिंबाचे दर भडकलेत खरे पण शेतकरी मात्र तोट्यातच असल्याचे वास्तव चित्र आहे. कारण यंदा उत्पादनात निम्म्याहून जास्त घट झाली आहे. मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षीपेक्षा लिंबाचे दर दुप्पट होऊनही गेला हंगामच चांगला होता, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

यंदा उन्हाचा चटका वाढला तशी लिंबाला मागणीही वाढली. दरवर्षी उन्हाळ्याचा बाजार डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी नियोजन करत असतात. उन्हाळ्यात लिंबाला बऱ्यापैकी दर मिळतो. त्यामुळे या काळात उत्पादन घेण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जास्त असते. वर्षभराचा विचार करता या चार महिन्यांत बाजारातली आवकही जास्त असते. यंदा मात्र चित्र उलट आहे. यंदा कडक उन्हाळा आणि रमजानचा महिना यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली. मात्र. उत्पादन कमी असल्याने, बाजारात लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लिंबाला विक्रमी दर मिळत आहे.

महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांत लिंबाचे दर वाढले आहेत. गुजरातमध्ये लिंबाला १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. तर महाराष्ट्रात १२० ते २०० रुपयाने व्यवहार होत आहेत. शेतकऱयांकडे लिंबाची 300 ते ४०० झाडे असूनही, फळ लागण्याच्या काळात धुक्यामुळे फळे गळून पडली आहेत. त्यामुळे उत्पादन घटलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत मला केवळ ३० टक्केच उत्पादन मिळालं. सध्या २०० रुपयांपर्यंत दर आहे. मात्र उत्पादन कमी असल्यामुळे लावणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.

गेल्या वर्षी ११ एप्रिलपर्यंत ७५० कट्टे स्थानिक बाजारात दाखल झाले होते. मात्र यंदा केवळ १२० कट्टे हाती लागले आहेत. यंदा दर दुप्पट झाला. पण त्याचा काही उरयोग नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी एका शेतकऱयांकडून रोज ५० ते ६० कट्टे बाजारात जायचे. पण यंदा केवळ ५ ते १० टक्के उत्पादन झाल्याने, बाजारातील अवक कमी झाली आहे. त्यामुळे या दरवाढीचा काही फायदा नाही. उलट गेल्या वर्षी लींबाचा हंगाम यापेक्षा बरा असल्याचे बोलेले जात आहे.

Exit mobile version