Kisan Credit Card Loan : किसान क्रेडिट कार्डवरुन मिळवा तीन लाखांचे कर्ज; वाचा सविस्तर

kisan-credit-card-loan

Kisan Credit Card Loan : शेतकर्‍यांना कोणत्याही कटकटीविना कर्ज मिळविण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने केवळ दोन आठवड्यात शेतकर्‍यांना तीन लाखांचे कर्ज यामाध्यमातून उपलब्ध होते. जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांची सर्व माहिती आधीपासून बँकेत उपलब्ध असल्याने त्यांना तर केवळ एक अर्ज व तीन कागदपत्रे दिल्यानंतर सहज कर्ज उपलब्ध होते.

कर्ज मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना बँकेत केवळ एक अर्ज करावा लागतो. अर्जासोबत ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि केसीसी कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट साईजचे दोन फोटोही द्यावे लागणार आहेत. कागदपत्रांबरोबर संबंधित शेतकर्‍याकडे अन्य कोणत्याही बँकेचे कर्ज नाही याचा अहवाल द्यावा लागणार आहे. याकरिता शेतकर्‍यास बँकेत जाण्याचीही आवश्यकता नाही. कारण गावागावात कॅम्पचे आयोजन केले जात आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावयाचा झाल्यास शेतकर्‍यांना ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट यापैकी एकाची प्रत द्यावी लागणार आहे. तर पत्ता म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड यापैकी एक द्यावे लागणार आहे. लाभार्थी हा शेतकरीच आहे यासाठी सातबारा उतारा, ८ अ याच्या प्रतिही जमा कराव्या लागणार आहेत. शिवाय जर शेतकरी हा दुसर्‍या बँकेचा कर्जदार नसायला पाहिजे. तसे प्रतिज्ञा पत्र त्याला द्यावे लागणार आहे.

Exit mobile version