शेतमालावर बाजारभावाच्या ७५ टक्के पर्यंत मिळते कर्ज; जाणून घ्या काय आहे योजना

90 of farmers repaid crop loans

पुणे : शेतमाल तारण योजनेची माहिती अनेकांना नाही. मात्र शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांपैकी ही एक योजना आहे. यात शेतमालावर ५० ते ७५ टक्के कर्ज मिळते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता ६ टक्के व्याजदर आहे. बाजारभावातील चढउतारात या योजनेचा योग्य प्रकारे वापर करुन घेतल्यास शेतकर्‍यांना मोठा फायदा होवू शकतो. किंबहुना अनेक शेतकर्‍यांना हा फायदा होत आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे, मोदी सरकारने गेल्या दोन महिन्याच्या काळात शेतीमाल तारण योजनेतून शेतकर्‍यांनी ७ कोटी ४९ लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे.

शेतीमाल साठवणूकीतून शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीमाल निहाय क्‍लस्टरमध्ये कर्ज वितरणाची योजना आहे. राज्य सहकारी बँकेमार्फत ही योजना राबवली जाते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर या योजनेचा अधिक लाभ घेतला जातो. बाजारपेठेत शेतीमलाला दर नाही आणि शेतकर्‍यास पैशाची गरज भासल्यास ही शेतीमाल तारण योजना अत्यंत फायदेशिर ठरते. यामध्ये शेतकरी शेतीमाल ठेऊन त्यावर कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे शेतकर्‍यांची गरज तर भागते पण शेतीमालही टिकून राहतो. योग्य दर मिळाला की त्याची विक्रीही करता येते.

गेल्या दोन महिन्यात शेतीमालाचे दर घसरले आहेत. असे असताना १ हजार ९३१ टनाच्या शेतीमाल तारणातून शेतकर्‍यांना ७ कोटी ४९ लाख रुपये कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये कर्ज हे हळदीपोटी घेतले गेले आहे तर त्यापाठोपाठ सोयाबीनवर शेतकर्‍यांनी कर्ज घेतले आहे. आता हळद आणि सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यावरच शेतकर्‍यांना ते अधिकच्या दरात विक्री करता येणार आहे.

शेतमालाचे प्रकारानुसार कर्जवाटप व व्याजदर
शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडीद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकर्‍यांना दिली जाते.
शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या ५० टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकर्‍यांना दिली जाते.

Exit mobile version