अशा पध्दतीने कमी खर्चात करा पपई लागवड

पुणे : अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अनेक शेतकरी पपई (Papaya) लागवडीकडे वळतांना दिसत आहे. नगदी पिकं म्हणून पपईची ओळख आहे. फळ म्हणून खाण्यासह पपईच्या फळापासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी, पपई पावडर, बेबी फूड्स ई प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या सर्व फायद्यांमुळे पपई लागवडीकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढतांना दिसत आहे. कमी खर्चात भरघोस उत्पादन घेण्यासाठी तंत्रशुध्द पध्दतीने लागवड व जोपासना करणे आवश्यक आहे.

पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही. या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचर्‍याला फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.

अशी करा तंत्रशुध्द पध्दतीने पपई लागवड

पपई लागवड बियांपासून रोपे तयार केली जाते. साधारणत: १ हे. क्षेत्रासाठी लागवड करण्यासाठी २५०-३०० ग्रॅम. बियाण्यांपासून रोपवाटिका तयार करावी. पपईची जात द्विलिंगी असल्यास जास्त बियाणे मात्राची आवश्यकता असते. जर जात उभयलिंगी असेल तर कमी बियाणे मात्राची आवश्यकता असते. द्विलिंगी जातींच्या झाडामध्ये ५०% नर झाडाची आवश्यकता असते अशा वेळी वेळेस फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाडे उपटून टाकावी लागतात. म्हणून अशा ठिकाणी २-३ रोपांची लागण करणे आवश्यक असते. पपई लागवडीपूर्वी जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी. कुळवाने वखरपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत व जमीन सपाट करून घ्यावी. पपई लागवड २.५ बाय २.५ किंवा २.२५ बाय २.२५ मी अंतरावर करावी.

Exit mobile version