शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकर्‍यांचे मॉल; या शहरात नव्या संकल्पनेला सुरुवात

farmer mall

प्रतीकात्मक फोटो

चंद्रपूर : शेतकरी शेतात राबराब राबून उत्पादन घेत असला तरी तो व्यापार्‍यांच्या दृष्टचक्रात भरडला जातो, अशी ओरड शेतकर्‍यांमधून नेहमीच होत असते. यावर पर्याय म्हणून अनेक शेतकरी शेतमालाची थेट बाजारपेठेत ग्राहकांनाच विक्री करते. मात्र हे तंत्र सर्वच शेतकर्‍यांना जमतेच असे नाही. यासाठी शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी चालविलेल्या शेतकरी मॉलीच संकल्पना अलीकडच्या काळात रुजतांना दिसत आहे.

चंद्रपुरात अशाच्या एका शेतकरी उत्पादित मॉलची सुरवात देखील झाली असून यामाध्यमातून शेतीमालाची विक्री देखील सुरु झाली आहे. शहरातील तुकूम भागात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हे मॉल सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शेतात भरघोस उत्पादन घेतल्यानंतर त्याची विक्री करुन मालाला चांगली बाजारपेठे मिळवून देण्याचा प्रयत्न हा शेतकर्‍यांचा राहणार आहे.

या मॉलमध्ये तांदूळ, हरभरा, हळद आणि तिखटसह विविध धान्यही देखील विक्रीसाठी आहेत. शेतीमालासाठी असे मॉल नव्यानेच झाले असून आता या ठिकाणी विषमुक्त उत्पादने विक्रीची सुवर्ण संधी राहणार आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांनाही एकाच छताखाल सर्वकाही मिळणार आहे. चंद्रपूर शहरात तर शेतीमालाचे मॉल उभारण्यात आले आहे. शिवाय आता जिल्हाभरातील तालुक्याच्या ठिकाणी आणि इतर लहान मोठ्या शहरामध्येही शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Exit mobile version