भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचे असे करा व्यवस्थापन

Pick pests

नाशिक : यंदा सततच्या पावसामुळे खरिप हंगामातील सर्वच प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. यातून भाजीपाला पिके देखील सुटली नाहीत. निसर्गाच्या लहरीपणामुळे भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळ्या कीड-रोगांचा प्रादूर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवी भाजीपाला पिकांमधील किटकरोगांचे व्यवस्थापन कसे करावे? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

भाजीपाला पिकातही कीटकरोग आढळल्यास ४.० मिली क्‍लोरपायरीफन्स २० ईसी १ लिटर पाण्यात विरघळवून सिंचनाच्या पाण्यात मिसळावे. यावेळी भाजीपाला पिकावर पांढरी माशी किंवा शोषक किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढते. हे टाळण्यासाठी, आकाश निरभ्र असताना १.० मिली इमिडाक्‍लोफिड ३ लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते शेतात प्रकाश सापळे देखील लावू शकतात, ज्यामुळे किडे आणि पतंग रात्रभर नष्ट होतील.

कमी किमतीचा प्रकाश सापळा बसवण्यासाठी प्लास्टिकच्या टबमध्ये किंवा मोठ्या भांड्यात कीटकनाशकाचे द्रावण मिसळा. यानंतर, टबवर एक स्टँड तयार करा आणि बल्ब लावा आणि शेताच्या मध्यभागी ठेवा. अशाप्रकारे, पिकांचे नुकसान करणारे हानिकारक कीटक प्रकाशाने आकर्षित होतील आणि टबमध्ये पडतील आणि तेथेच नष्ट होतील.

Exit mobile version