युरोपमध्ये धुमाकुळ घालण्यासाठी भारतीय आंबा सज्ज; ब्रेसेल्समध्ये पार पडले ‘मँगो फेस्टिव्हल‘

mango

मुंबई : भारतीय आंब्याची चव काही वेगळीच असते. यामुळे परदेशातही भारतीय आंब्यांना मोठी मागणी असते. यंदाच्या हंगामात युरोप वगळता अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात झाली आहे. आता युरोपीयन देशांमध्ये भारतीय आंब्याला बाजारपेठ निर्माण व्हावी म्हणून ब्रेसेल्स येथे ‘मँगो फेस्टिव्हल‘चे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. या अनोख्या सोहळ्यामध्ये भारतामधील अनेक प्रकारचे आंबे होते. त्यामुळे आगामी काळात युरोपातील देशांना भारतीय आंब्याची चव चाखायला मिळणार हे नक्की.

भारताच्या आंब्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी असते. त्यामुळे युरोपीय भाग वगळता उर्वरित जगात आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही केवळ निर्यातीमुळे आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता युरोपीय राष्ट्रांमध्येही बाजारपेठ निर्माण होत असल्याने अधिकची मागणी होणार आहे.

आंबा पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. मात्र अजूनही युरोपची दारे भारतीय आंब्यासाठी बंदच आहेत. ती खुली करण्यासाठी ब्रेसेल्स येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरिकांना भारतीय आंब्यांची चव चाखता आली आहे. शिवाय महोत्सवाला मिळालेल्या प्रोत्साहानंतर युरोयपीय युनियनमधील भारतीय राजदूत यांनी येथील मार्केट बद्दल विश्‍वास व्यक्त केला आहे.

३६० मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना
लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन ३६० मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाली. यंदा निर्यातीमुळे आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी २०१९ च्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण हे कमी राहिले आहे. तर गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंबा निर्यातच झाली नव्हती. २०१९ च्या तुलनेत ३२५ मेट्रिक टनाने निर्यात ही घटली आहे. दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्येही मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची निर्यात केली जाते. पण गेल्या वर्षीपासून या देशातील निर्यात बंद आहे. देशात कोरोनाचा वाढच्या प्रादुर्भावामुळे या देशातील कृषी विभागाने भारतीय आंब्याच्या आयातीस परवानगी दिली नाही.

Exit mobile version